कालकथित जे. टी. कांबळे यांचा चतुर्थ स्मृतिदिन संपन्न

नाशिक प्रतिनिधी
डॉ. शाम जाधव
सांगली आज रोजी बौद्ध धम्म संस्कार संघ ,श्रावस्ती विहार सांगली चे माजी कालकथित उपाध्यक्ष जे. टी. कांबळे यांचा चतुर्थ स्मृतिदिन दिनानिमित्त भंते धम्मदिप श्रावस्ती विहाराचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर कोलप, संचालिका उषा कांबळे, विहाराचे माजी संचालक शंकरराव हर्षद, भारतीय बौद्ध संघाचे बौद्धचार्य दयानंद आत्माराम कांबळे, श्रावस्ती विहाराचे माजी सचिव परमित धर्मकीर्ती, खजिनदार माने सर उपासीका रंजना बाळू शिंदे, कालकथित जे. टी. कांबळे यांचे संपूर्ण कुटुंब इत्यादी उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेस धूप अगरबत्ती आदरांजली वाहण्यात आली.
सदरचा स्मृतिदिनाचा कार्यक्रम त्यांच्या राहते घरी संपन्न करण्यात आला. विहाराचे बांधकामासाठी त्यांचे मोलाचे योगदान होते तसेच ते आपल्या सेवानिवृत्ती वेतनातून दरमहा दहा हजार रुपये दान देत असत त्यांची अर्थ दान पारमिता आणि श्रद्धा खूपच होती. विहाराच्या समृद्धीसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
त्यांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली यांच्यावतीने भावपूर्ण अभिवादन बौद्ध धम्म संघ श्रावस्ती विहार सांगली यांच्या वतीने चतुर्थ स्मृतिदिन उजाळा देण्यात आला