इतर

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी गोविंदराव वाकडे यांची निवड .

दत्ता ठुबे

पारनेर – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, न्यूज १८ चे ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव वाकडे यांची प्रदेशाध्यक्षपदी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निवड करण्यात आली आहे. तर अहिल्या नगर जिल्हयातून दैनिक लोकआवाज चे पारनेर तालुका प्रतिनिधी सुरेश खोसे पाटील यांची राज्य कार्यकारिणी वर निवड करण्यात आली . राज्यभरातील पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी ही कार्यकारिणी नवे धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.
या विशेष बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे, ऑल इंडिया जनरल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रणधीर कांबळे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष निलेश सोमणी, सोशल मीडिया अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांनी मानले.
प्रदेशाध्यक्ष पदी गोविंद वाकडे ,प्रदेश कार्याध्यक्ष पदी निलेश सोमानी , इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रदेशाध्यक्षपदी अतुल परदेशी , सोशल मीडिया प्रदेशाध्यक्षपदी सिद्धार्थ भोकरे , प्रदेश उपाध्यक्षपदी अशोक देडे , किशोर रायसाकडा , डॉ. अभय कुमार दांडगे , नितीन शिंदे , महेश पानसे , आरोग्य सेल प्रदेशाध्यक्षपदी डॉ. अमित कुमार खाडे , पत्रकार हल्ला विरोधी समिती प्रमुखपदी किशोर पाटील , मंत्रालय संपर्कप्रमुखपदी नितीन जाधव , सांस्कृतिक विभाग प्रमुख पदी संदीप भटेवरा , संघाचे प्रवक्तेपदी रमेश डोंगरे यांची निवड करण्यात आली .
विदर्भ प्रमुखपदी नयन मोंढे ,
अमरावती विभागीय अध्यक्षपदी सुनील फुलारी, शैलेश पालकर ,नागपूर विदर्भ प्रमुखपदी अनुपम कुमार भागरव , उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुखपदी भुवनेश दुसाने , पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी नितीन शिंदे , पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिवपदी संजोग काळदंते , मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी अनिल सावंत , कोकण विभागीय अध्यक्षपदी शैलेश पालकर , कायदेविषयक सल्लागार पदी ॲड. रचना भालके .प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून मुंबईचे प्रशांत कांबळे , स्वामी शिरकुल वैदु , नांदेडचे संग्राम मोरे , सोलापूरचे स्वामीराव गायकवाड , ठाणेचे सुभाष विसे ,कोल्हापूरचे बाजीराव फराकटे,अहिल्यानगरचे सुरेश खोसे पाटील व अनिल रहाणे ,ठाणेचे श्रद्धा ठोंबरे , नाशिकचे लक्ष्मण डोळस ,सिंधुदुर्ग चे सिताराम गावडे धाराशिवचे अरुण लोखंडे ,नागपूरचे शरद नागदेवे नांदेडचे रुपेश पाडमुख संभाजी नगर चे प्रभू गोरे सोलापूरचे राजेंद्र कोरटे-पाटील संभाजी नगर चे कुंडलिक वाळेकर नंदूरबारचे रवींद्र गुरव जळगावचे अबरार मिर्झा साताऱ्याचे संतोष खालकर वाशिमचे पंकज सोनवणे धुळ्याचे प्रा . जसपाल सिसोदिया (धुळे) , नवनाथ जाधव प्रदेश प्रसिद्धी प्रमुख तर सहाय्यक विनोद कोळी , प्रदेश संपर्कप्रमुख पदी वैभव स्वामी गुजरात प्रांतिक अध्यक्ष म्हणून रमजान मंसुरी , मध्य प्रदेश अध्यक्ष म्हणून मनीष महाजन , दिल्ली संपर्कप्रमुख म्हणून राजश्री चौधरी , रघुनाथ सोनवणे , गोवा संपर्कप्रमुख म्हणून आबा खवणेकर यांची निवड करण्यात आली.
या बैठकीत पत्रकारांच्या संरक्षण आणि हक्कांसाठी संघटनेने महत्त्वाचे निर्णय घेतले , पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची मजबूत कार्यप्रणाली तयार करून पत्रकारांवरील हल्ल्यांना वाचा फोडण्याचा निर्णय , महिला पत्रकारांसाठी विशेष सुरक्षा आणि मदत केंद्र निर्माण करण्याचा प्रस्ताव , राज्यातील विविध जिल्ह्यांतील पत्रकारांसाठी कायदेशीर मदत आणि तक्रार निवारण प्रणाली उभारण्याचा मानस , शासनाच्या विविध योजनांचे सर्वेक्षण करून त्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सरकारकडे अहवाल सादर करणे , पत्रकारांसाठी प्रशिक्षण शिबिरे, मार्गदर्शन सत्रे आणि डिजिटल पत्रकारितेवर विशेष कार्यशाळांचे आयोजन.
राज्यातील पत्रकारांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या या नव्या कार्यकारिणीने पत्रकारांच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. नवीन पदाधिकाऱ्यांना राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
संघटनेच्या नेतृत्वाने स्पष्ट केले की, महाराष्ट्रातील पत्रकारांच्या विकासासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी ही संघटना लढा देत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button