अनुदानित आश्रमशाळा सामोडे येथे डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती वाचन प्रेरणा दिन॔ म्हणून साजरा

शिर्डी प्रतिनिधी :
(संजय महाजन)
अनुदानित आश्रमशाळा सामोडे येथे भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. सकाळ सत्रात निवडक विद्यार्थ्यांचे वाचलेल्या व आवडलेल्या लेखकांच्या कथा संग्रहातील कथांचे वाचन हा कार्यक्रम पार पडला तदनंतर डॉ.कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मनेष माळी तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे शिक्षक झेड.एम.गवळी,जे.पी.सोनवणे, गणेश भावसार हे होते.
प्रथमतः डॉ कलाम यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. डॉ कलाम यांच्या जीवनावर प्रा.विजय ठाकरे यांनी माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रविण पगारे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱी प्रयत्नशील होते.