इतर

गावठी कट्टा बाळगणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद, पारनेरच्या पोलीस पथकाची कारवाई

दत्ता ठुबे/ पारनेर प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील गावठी कट्टा बाळगणा-या विकास रोकडे यांस पारनेर पोलीसांनी सापळा लावुन त्याचे राहते घरी पकडले आहे.काही दिवसांपासुन, अहमदनगरचे पोलीस अधिक्षक राकेश ओला, अजित पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण अहमदनगर यांनी टाकळी ढोकेश्वर हद्दीमधे अग्निशस्राचा धाक दाखवुन तसेच वापर करुन घडलेल्या गुन्ह्यांचे अनुषंगाने गोपनिय माहीती काढुन,अवैध शस्रे, अग्निशस्रे बाळगणार्‍यांवर कारवाई करण्याबाबत पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना योग्य त्यासुचना दिल्या होत्या.त्या अनुशंगाने पो.नि.बळप यांनी त्यांच्या टिममधील अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करत पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या शस्र बाळगणार्‍या इसमाचा शोध घेवुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार दि. २७ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना गुप्त माहीती मिळाली की,इसम नामे विकास सुरेश रोकडे रा.वडगांव सावताळ,ता.पारनेर हा त्याचे कब्जात एक गावठी कट्टा बाळगुण आहे.त्याबाबत त्यांनी पोलीसपथक तयार करुन त्यातील अधिकारी व अंमलदारांना सुचना व मार्गदर्शन करत छापा मारणेकामी रवाना केले.त्यानुसार साफळा लावत विकास सुरेश रोकडे याला वडगांव सावताळ यांस त्याचे राहते घरी ४ जिवंत काडतुसा सह त्यावर केएफ ७.६५ असे नमुद केलेली व एक लोखंडी मॅग्झीन मिळुन आले आहे.

पुढे आरोपी विकास रोकडे यांस पोलीसी खाक्या दाखवत अधिकचा तपास करता त्याने हा कट्टा बिहारच्या एका व्यक्ती कडुन विकत घेतला असुन, कट्टा व जिवंत काडतुसे हा त्याचा साथीदार पप्पु भिमाजी खोसे रा.वडगांव सावताळ,ता. पारनेर याचेकडे असल्याचे सांगीतले.त्यानुसार त्याच्यावर पारनेर पोलीसस्टेशनला पोलीस काॅन्स्टेबल श्रीनाथ नवनाथ गवळी यांच्या तक्रारीवरुन पारनेर पोलीसस्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई अहमदनगरचे पोलीस अधिक्षक राकेश ओला, अहमदनगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीसस्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, उपनिरीक्षक हनुमान उगले, हेड काॅन्स्टेबल संदिप गायकवाड,पोलीस नाईक गहीणीनाथ यादव, राम मोरे, श्रीनाथ गवळी,सुरज कदम,सचिन लोळगे,विवेक दळवी व पथकाने केल्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी सांगीतले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button