नेप्तीत ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या बैठकीला मोठा प्रतिसाद

ग्रामसुरक्षा यंत्रनेमुळे गुन्हेगारीला आळा बसेल -लोकरे
अहमदनगर – ग्रामसुरक्षा यत्रंणे चा वापर केल्यास गावात होणाऱ्या गुन्हेगारीला आळा बसेल, तसेच दरोडे , चोऱ्यासह अनुचीत प्रकार वर अंकुश राहिल यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर सर्वांनी करावा असे प्रतिपादन गणेश लोकरे यांनी केले .
नगर तालुक्यातील नेप्ती येथील जय तुळजा भवानी मांदिरात ग्रामसुरक्षा यंत्रणेची बैठक पार पडली. या बैठकीत जन जागृती व ग्रामसुरक्षा यंत्रणेची माहीती ग्रामस्थांना देण्यासाठी ग्रामसुरक्षा यत्रंणा, ग्रामपंचायत व नगर तालुका पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विदयमाने बैठकीच आयेजन करण्यात आले होते. या बैठकीला ग्रामस्थ व माहिला मोठया संख्येने उपस्थित होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच संजय जपकर होते. यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांचा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ढवळे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रामसुरक्षा यंत्रणेचे वरीष्ठ अधिकारी गणेश लोकरे यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेबाबतीची माहिती देऊन या यंत्रणेचे प्रात्यक्षिक करुन दाखवले . यावेळी लोकरे म्हणाले या यंत्रणेमुळे आपत्कालीन परीस्थीतीमुळे गावपातळीव वेळीच प्रभावी मदत यञांणा उभी राहणार आहे. गेल्या दोन वर्षात या यत्रंणेमुळे अनेक गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत .अनेक दुर्घटना टाळल्या आहेत. प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी या यत्रंणे चा वापर केल्यास गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणात आळा बसेल. ग्रामसुरक्षा यत्रणेमुळे चोरी, दरोडे प्रमाण कमी होईल. यावेळी उपसरपंच संजय जपकर मिळाले की
आपतकालीन परीस्थीत पोलीस यंत्रणा, महसुल विभागाला ही सुरक्षाच्या उपाय योजनेसाठी लोकांशी संपर्क ठेवण्यास मदत होणार असल्याने ग्रामस्थानी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर करावा . ग्रामसुरक्षा यञांणेची माहीती देणाया छापील पुस्तकाचे ग्रामसुरक्षा यञणेचे वाटप यावेळी करण्यात आले. नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक शिवाजी ढवळे साहेब ,पोलीस पाटील अरुण होले, माजी सरपंच विठठल जपकर, उपसरपंच संजय जपकर, संजय अशोक जपकर, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रामदास फुले, ग्रामसेवक लाल भाई शेख ,माजी उपसरपंच शिवाजी होळकर ,वसंत पवार, बंडू जपकर, दादू चौघुले, बाळासाहेब बेल्हेकर, तुकाराम बेल्हेकर, मंजाबापू आल्हाट, अमोल चौगुले, रामदास कल्हापुरे, सोमनाथ व्यवहारे, दिलीप होळकर,माच्छिंद्र होळकर, राहुल गवारे, अभिजीत जपकर ,जालींदर शिंदे, राजू गवारे, एकनाथ होले, पोपट कोल्हे, शरद पवार भानुदास फुले , मुख्याध्यापक सुरेश कार्ले, जमीर सय्यद ,मीरा जपकर, राजश्री कोल्हे, सुनिता आल्हाट, मंदा कर्डिले ,वैशाली होळकर, अंगणवाडी सेविका राशन दुकानदार व सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .
