शिवाजी देशमुख यांचे कडून वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना वारकरी पोशाख भेट!

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ गावातील दानशूर व्यक्तिमत्व व सांमाजीक कार्यकर्ते शिवाजी तुकाराम देशमुख उर्फ डी आर मामा यांनी श्री कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्था कोतुळ व अगस्ती ऋषी गुरुकुल अकोले या दोन्ही वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना संपूर्ण वारकरी पोशाखाची भेट दिली
या संस्थेतील 120 विद्यार्थ्यांना त्यांनी पोशाख दान स्वरूपात दिला त्यांच्या या दातृत्वाचे कौतुक म्हणून त्याचा छोटासा सन्मान संस्थेचे मार्गदर्शक समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, आमदार डॉ.किरण लहामटे, ह भ प दीपक महाराज देशमुख सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्रीक्षेत्र इंदोरी या ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये संपन्न झाला
श्री शिवाजी देशमुख याच्या या दातृत्वातून वारकरी शिक्षण संस्थेतील 120 विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला