जिल्हास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शनात आयुष वाकचौरे याचे प्रतिकृतीला प्रथम क्रमांक

अकोले ( प्रतिनिधी )
जिल्हास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शनामध्ये आयुष नवनाथ वाकचौरे या कळसेश्वर विद्यालया च्या विध्यार्थ्याने बनविलेल्या ” बहुउद्देशीय सायकल ” या प्रतिकृती ची आदिवासी गटातून जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे.
कळसेश्वर विद्यालयाच्या इयत्ता आठवी चा विध्यार्थी आयुष वाकचौरे याने टाकाऊ वस्तू पासून टिकावू वस्तू बनवली असून शेती व पर्यावरण विषयात ” बहुउद्देशीय सायकल ” बनवली आहे. डोंगर दऱ्यातील शेती करणाऱ्या आदिवासी बांधवाना भात उफननी यंत्र उपलब्ध करणे, विज विरहित मोटार पंप, कडबाकुट्टी, वूड कटर,फवारणी यंत्र, वीळा कोयता कुऱ्हाड खुरपे यांना धार काढणे.,
पर्यावरणाची हानी रोखणे हा उद्देश ठेऊन सदर प्रतिकृती सादर केले. सावंतवाडी सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या ५१व्या बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनासाठी राज्यस्तरावर निवड झाली आहे. या विध्यार्थ्याला विज्ञान शिक्षक शिवाजी आवारी यांचे मार्गदर्शन लाभले. आयुष वाकचौरे हा कळस चे माजी सरपंच यादवराव वाकचौरे यांचे नातू आहेत.
आयुष वाकचौरे याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री ना. राधकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समिती चे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, अगस्ती एजुकेशन संस्थेच्या सेक्रटरी दुर्गाताई नाईकवाडी, अध्यक्षा शैलेजा पोखरकर, कार्याध्यक्ष सतीश नाईकवाडी, काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे, सरपंच राजेंद्र गवांदे, जयकिसान दूध संस्थचे चेअरमन भाऊसाहेब वाकचौरे, उपसरपंच केतन वाकचौरे, मराठा महासंघाचे नामदेव निसाळ, शिवसेनचे रावसाहेब वाकचौरे यांनी अभिनंदन केले.