पारनेरमध्ये २ ते ४ डिसेंबरला राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा – आमदार नीलेश लंके

३० नोव्हेंबरला पुरुष व महिला खेळाडूंची जिल्हा निवड चाचणी
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :-
पारनेर शहरातील क्रिडा संकुलावर २ डिसेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत विद्युत प्रकाश झोतात राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी ३० नोव्हेंबर रोजी पुरुष व महिला खेळाडूंची जिल्हा निवड चाचणी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य डायरेक्ट व्हॉलिबॉल प्रमोशन असोसिएशन अध्यक्ष आमदार निलेश लंके, प्रा. बबनराव झावरे, प्रा. संजय लाकुडझोडे यांनी दिली आहे. राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धांचे अर्जुन करण्याचा मान पहिल्यांदाच मिळाला मिळाला असून हॉलीबॉल प्रेमींसाठी ही स्पर्धा पर्वणी ठरणार आहे.
महिला व पुरुष अजिंक्यपद अहमदनगर जिल्हा डायरेक्ट व्हॉलिबॉल प्रमोशन असोसिएशन पुरुष व महिला अजिंक्यपद व जिल्हा निवड चाचणी स्पर्धा (संलग्न महाराष्ट्र राज्य डायरेक्ट व्हॉलिबॉल प्रमोशन असोसिएशन) च्या माध्यमातून क्रीडा संकुल पारनेर, सुपा रोड येथे बुधवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ सकाळी ११ वा.अहमदनगर जिल्हा निवड चाचणी स्पर्धा बुधवार दि. ३०-११-२०२२ रोजी क्रीडा संकुल पारनेर येथे ११ वाजता आयोजित केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय खेळाचा दर्जा असणारा व्हॉलिबॉल खेळाला महत्व प्राप्त झाले असुन डायरेक्ट व्हॉलिबॉल प्रमोशन असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष म्हणून पारनेर नगर मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांची राज्याचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्या नंतर महाराष्ट्रातील व्हॉलीबॉल खेळाडूंना एक क्रिडा व्यासपीठ मिळवून द्यायचे असे ठरवून पारनेर शहरात राज्यस्तरीय पुरुष व महिला संघाच्या स्पर्धांचे नियोजन केलेले आहे. व त्या स्पर्धेतुनच राज्यासाठी खेळणाऱ्या संघाची निवड करण्यात येणार आहे.
उशिरा येणाऱ्या संघास स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
स्पर्धेत निवड झालेला संघ याच मैदानावर दि.३ व ४ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होईल.स्पर्धेत येणाऱ्या खेळाडूंना आयोजकांकडून विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत . तरी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पुरुष व महिला संघानी सहभाग घ्यावा असे आवाहन आ. निलेश लंके (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य डायरेक्ट व्हॉलिबॉल प्रमोशन असोसिएशन), प्रा. बबनराव झावरे (उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य), प्रा. संजय लाकूडझोडे चंद्रभान ठुबे, बायस रावसाहेब, मुस्ताक सर, राजू तांबे, नितीन गांधी, जयवंत साळुंके, मच्छु पारखे, प्रा. चक्रनारायण, नगर सर, बापुराव होळकर, दिलीप वाबळे, प्रा. दत्तात्रय बांडे, संदीप निंबे, बाबा शेख, प्रा.गायकवाड यांनी केले आहे. या नियोजन बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कावरे, सभापती पिंटू शेठ आडसुळ, विजय डोळ, सरपंच भोगाडे, सुदाम दळवी, चंद्रकांत ठुबे, सुरज नवले, नगरसेवक योगेश मते, भुषण शेलार, संदिप औटी, श्रीकांत चौरे, बाळासाहेब लंके यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहभागी होणाऱ्या संघातील प्रत्येक खेळाडूने आपल्या आधार कार्डच्या दोन झेरॉक्स प्रती व तीन फोटो सोबत घेऊन यावे त्या शिवाय स्पर्धेत भाग घेता येणार नाही आसेही यावेळी आमदार लंके यांच्या उपस्थितीत पार पाडलेल्या बैठकीत सांगण्यात आले.
या राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राज्यातील व्हॉलिबॉल शौकीन व खेळाडूंनी सहभाग नोंदवून हे राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा यशस्वी करावे आसे आवाहन राज्याचे अध्यक्ष आमदार नीलेश लंके व आयोजकांकडून करण्यात आले.