पारनेर बसस्थानक बनले खाजगी जाहिराती चे केंद्र

दत्ता ठुबे/ पारनेर दि.२१
राज्य परिवहन महामंडळाचे पारनेर आगार हे तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. त्या मूळे या आगारात प्रवासी यांची कायमच भरपूर वर्दळ असते. पारनेर आगार कडून प्रवाश्यांना प्रवास सुखसोयी व सुविधा देण्यात येतात परंतु पारनेर आगारात बरेच वर्षापासून एकही प्रवासी संघटना अस्तित्वात नसल्याने बसस्थानकवर प्रवासी करिता असलेल्या सुख सोयी सुविधा साठी प्रश्न उपस्थित करता येत नाही. पारनेर तालुक्यातील सजग नागरिक यांनी ज्येष्ठ नागरीक, शालेय विद्यार्थी, महीला, यांना बसस्थानक वर सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तालुकास्तरीय प्रवासी संघटना स्थापन करावी अशी मागणी पारनेर तालुक्यातील सजग नागरिक करत आहेत.
सविस्तर माहिती अशी की, राज्य परिवहन महामंडळाच्या पारनेर आगार व्यवस्थापक कडून तालुक्यांतील बसस्थानक वर येणाऱ्या प्रवासी करिता सूख सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या मध्ये प्रवास सुखसोयी व सुविधा, स्वच्छ आगार, स्वच्छ बसस्थानक, मार्गस्थ निवारे, उपहार गृह व चहाची दुकाने, पुस्तकाची दुकाने, इतर वाणिज्य आस्थापना, सुलभ व्यवस्था, थंड पाण्याची सोय, बसेसची फेरी वेळापत्रक माहिती, विशेष बस मिळने बाबतची माहिती, मासिक त्रैमासिक पास, आवडेल तेथे प्रवास, विदयार्थी सवलत पास, अधिस्वीकृती धारक पत्रकार पास, आदिवासी सेवक, दलीत मित्र अण्णाभाऊ साठे पुरस्कर्ते पास, नविन बस सेवा सुरू करणे, अपघात नुकसान भरपाई रक्कम मिळणे बाबत या सामान्य नागरीकांना बसस्थानक संधर्भात सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पारनेर तालुक्यांतील डॉक्टर, वकील, इंजिनिअर, सामजिक कार्यकर्ते, राजकारणी,सेवा निवृत्त चालक, वाहक, प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी, ज्येष्ठ पत्रकार या सर्वाची एक तालुकास्तरीय प्रवासी संघटना स्थापन करण्यात यावी अशी मागणी होत आहे. त्या मुळे प्रवासी समास्या सोडवण्यास मोठी मदत होणार आहे.
पारनेर आगार हे समस्यांचे आगार झाले आहे. सुविधांचा अभाव असल्याने पारनेर बसस्थानक वर प्रवासी यांची गैरसोय होत आहे. पिण्याचे पाण्याची असुविधा, स्वच्छते चा अभाव, बसस्थानक आवारात असलेली खाजगी वाहन धारकांची अरेरावी, खाजगी वाहन धारक आवारातच वाहन पार्क करत असल्याने वाहन चालक यांना नाहक मानसिक त्रास होत आहे, बसस्थानक मध्ये प्रवासी करीता गार हवा मिळावी अशी अपेक्षा असते परंतू फक्त वाहतूक नियंत्रक यांच्या केबिन वरीलच पंखा फक्त चालू असतो. प्रवासी यांना पण सुविधा देणे बसस्थानक प्रशासनाचे कर्तव्य आहे. बसस्थानक परिसरातील गटार उघड्या असल्याने रात्रीच्या वेळी नागरीकांना धोका दायक बनल्या आहेत. प्रवासी करीता स्वच्छ पिण्याचे पाण्याची सुविधा करणे अपेक्षित आहे परंतु आगाराच्या गेट शेजारी लिंबाच्या झाडाखाली एक पाण्याची टाकी नावालाच ठेवली आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांनी या सुविधा बाबत प्रशासनाशी निवेदन व चर्चा केली परंतु अधिकारी यांची जनतेसाठी सकारात्मक प्रशासकीय काम करण्याची मानसिकता नसल्याने पिण्याची पाण्याची सोय करण्यास असमर्थ ठरत आहेत.
बसस्थानक करते कंपन्यांची जाहिरात, बसस्थानक वर एस टी महामंडळाचे कमी कंपन्यांचे जाहिरातीचे जास्त फलक लावलेले दिसतात. एस टी च्या महत्त्व पूर्ण फलकावर या जाहिराती लावण्यात आल्याने प्रवासी यांना माहिती दिसत नाही. त्या मूळे बसस्थानक प्रशासनाने खाजगी कंपन्यांची जाहिरात करण्याचा ठेका घेतला का. असे चित्र या ठिकाणीं पहावयास मिळत आहे. या सर्व समस्या सोडवण्यासाठी तालुका स्तरीय संघटना यशस्वी ठरेल. त्या मुळे सजग नागरिकांनी एकत्र येऊन लवकरात लवकर समविचारी नागरिकांनी एकत्र येऊन संघटना स्थापन करावी अशी मागणी होत आहे.