सुधीर आरोटे यांना कला शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार.

विलास तुपे
राजूर / प्रतिनिधी
राज्यस्तरीय कलासाधना सामाजिक संस्था नवी मुंबई यांच्या वतीने इंदोरी तालुका अकोले येथील सुधीर बाबुराव आरोटे यांना राज्यस्तरीय आदर्श कला शिक्षक पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला सुधीर आरोटे हे विल्सन हायस्कूल गिरगाव मुंबई येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहे यापूर्वी त्यांच्या चित्राचे मुंबईतील कला गॅलरीमध्ये चित्र प्रदर्शन भरले होते ग्रामीण भागातून प्रतिकूल परिस्थितीत चित्रकलेचे शिक्षण घेत त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वास्तु तज्ञ डॉक्टर रविराज अहिरराव सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप कर्करोग तज्ञ अमजद खान पठाण शिक्षण उपसंचालक सुरेश माळी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र स्मृतिचिन्ह व भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप होते त्यांच्या या यशाबद्दल आ. डॉ किरण लहामटे जिल्हा बँकेचे संचालक सिताराम पाटील गायकर माजी आमदार वैभव पिचड इंदूरचे सरपंच व वैभव नवले आदींनी त्यांचे अभिनंदन करीत कौतुक केले आहे