इतर
माजी मंत्री पिचड यांच्या आरोग्यसाठी अबीतखिंड येथील भैरवनाथ मंदिरात महाआरती

अकोले प्रतिनिधी
आदिवासी चे ह्रदयसम्राट ,माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना अचानक ब्रेन स्टोक चा झटका आल्याने त्यांच्यावर नाशिक येथे रुग्णालयात उपचार सुरू आहे
त्यांची तब्बेत सुधारून त्यांनी पुन्हा तालुक्यातील जनतेसाठी लवकर बरे व्हावे यासाठी कुलदैवत अबीतखिंड येथील भैरवनाथ मंदिरात महाआरती करून आरोग्य सुधारण्या साठी प्रार्थना केली
सर्वोदय विद्यालय अबीतखिंड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अबीतखिंड, भोजनेवाडी, वाजेवाडी विद्यार्थी , भैरवणाथ सेवा मंडळ व ग्रामस्थ यानी संयुक प्रार्थना केली यावेळी
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष रामनाथ भोजने,सुधाकर गोडे ,मुरलीधर गोडे, शंकर गोडे, अनिल भोजने, आदी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते