इतर

खबरदार शेअर ट्रेडर्स आणि अवैध धंद्याच्या विरोधात बातम्या छापाल तर …..

अहिल्यानगर/ प्रतिनिधी

खबरदार शेअर मार्केट आणि अवैध धंद्याच्या विरोधात सोशल मीडियावर बातमी करशील तर “जीवे मारून टाकीन” अशी धमकी शेवंगावा तील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार अविनाश देशमुख यांना दिली आहे

अज्ञात तीन ते चार व्यक्तीनी तोंडाला मास्क बांधुन सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अविनाश देशमुख यांना दिली निर्जन स्थळी ही धमकी दिली मंगळवारी रात्री ही घटना घडली

सातत्याने शेवगांव शहर आणि तालुक्यातील शेअर मार्केट आणि अवैध धंदे आणि सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविल्याने त्याचा राग मनात धरून विना क्रमांकाची थार कंपनीच्या गाडी आडवी घालुन मला जीवे मारण्याची धमकी दिली तोंडाला मास्क बांधलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी हनुमान मंदिर खालची वेस शेवगांव या ठिकाणी रात्री हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेलो असताना परताना दिनांक 22 ऑक्टोबर मंगळवार रोजी रात्री नऊ ते साडेनऊ च्या दरम्यान तु शेवगांव तालुक्यातील शेअर ट्रेडर्स आणि अवैध धंद्याच्या विरोधात कायम बातम्या करतो तुला जगायचा कंटाळा आला कां असे म्हणुन तुला गाडीच्या चाकाखाली जीवे मारून टाकु किंवा तुझ्या विरोधात शेवगांव पोलिसात खोटे गुन्हे ऍट्रासिटी बलात्कार असे खोटे गुन्हे दाखल करून तुला जेल मध्ये पाठवु आमच्या नादी लागु नको नाहीतर तुला शेवगांव मध्ये जगन मुश्किल करू टाकु अशी धमकी दिली

या बाबत अविनाश देशमुख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाची राहील मी माझा मृत्यु पूर्व जबाब जिल्हा सहकारी ब्यांकेच्या लॉकर मध्ये लिहून ठेवणार आहे सामाजिक कार्य करताना माझा बळी गेला तरी तो सार्थकी लागेल माझ्या सतत च्या लिखाणातून प्रेरणा घेणाऱ्या माझ्या वाचकांना माझे जीवन समर्पित करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button