पिंपळदरी आश्रम शाळा वसतिगृहाला 27 फॅन ची भेट

अकोले प्रतिनीधी
रयत शिक्षण संस्थेची ,कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा पिंपळदरी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर येथे 4 ऑक्टोबर 2024 रयत शिक्षण संस्थेच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात बोलताना, शाळेचे प्राथमिक शिक्षक सुनील शेळके यांनी बांधकाम पूर्ण झालेल्या मुलींच्या वस्तीगृहातील 27 खोल्यांमध्ये 27 फॅन देणगी स्वरूपात मिळवण्याचा संकल्प केला होता त्यानुसार त्यांनी मित्रपरिवाराला आवाहन केले त्यांच्या या आव्हानाला दानशूर मित्र परिवाराने साथ देऊन क्रॉम्प्टन कंपनीचे 27 फॅन खरेदी करण्यासाठी निधी एकत्रित केला व दिनांक बावीस दहा दोन हजार चोवीस रोजी दीपावली निमित्त आश्रम शाळा वस्तीगृह व मुख्याध्यापक प्रशासनाकडे हे फॅन सुपूर्त करून संकल्प पूर्ण केला.

या कामी लेखक व उपक्रम शिक्षक भाऊसाहेब कासार, प्रा. डॉ.रंजना कदम भाग्यवंत , मनीषा प्रल्हाद देशमुख , लेखक राजेंद्र भाग्यवंत , बाळासाहेब सखाराम शेळके , नारायण जयराम चौधरी, आप्पासाहेब विठ्ठल वाकचौरे ,दीपक कारभारी कानवडे, प्रा.अशोकराव दामोदर मुरादे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष धावजी मेंगाळ , शिवनाथ सहादु भोजने, आकाश बाळासाहेब रंधे ,नवनाथ सहदेव गोसावी ,रोहिदास भागुजी रंधे, धनंजय शिवराम मलाव ,भाऊसाहेब उत्तम राऊत ,वेदांत राधेश्याम जगधने ,रोशन मच्छिंद्र घुले, साक्षी व तनुष्का सुनील शेळके, प्रणव धनंजय मलाव ,प्रणाली प्रमोद कोल्हे, गार्गी व तन्मय नवनाथ गोसावी, गितेश व सिद्धेश कैलास आंबरे यांचे आर्थिक सहकार्य मिळाले. सदर देणगीदारांचे शाळेचे मुख्याध्यापक धनंजय मलाव तसेच विभागीय अधिकारी बोडके साहेब यांनी आभार मानले व उपक्रमाचे कौतुक केले.