सोलापूर
अपघात टाळण्यासाठी राईट टू वॉक’ ची जनजागृती , सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

.सोलापूर प्रतिनिधी
सध्याच्या वातावरणात सोलापूरसह अनेक शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढतच आहे. जुन्या वाहतूक नियमांमुळे रस्त्याच्या डावीकडूनच वाहने व पादचारी जातात. यामुळे ‘मागून येणा-या वाहनांमुळे पादचा-यांच्या अपघातात’ मृत्यू होऊन संख्येत वाढ होत आहे. कालबाह्य ठरलेल्या वाहन संदर्भातील काही नियम रद्द करण्यासाठी शासन स्तरावर लवकरात लवकर पत्र व्यवहार व्हावेत. यामुळे ‘पादचा-यांचे जीव’ वाचेल,
सध्या हिवाळ्यात किंवा इतर वेळी आरोग्याच्या दृष्टीने शहर आणि जिल्ह्यात अनेक नागरिक यामध्ये ज्येष्ठांसह महिला, लहान मुले पहाटेच्या वेळी वॉकींगला जाण्याची धडपड असते. तसेच सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी बाजार करण्यासाठी चालत असतात. जुन्या नियमांमुळे डावीकडून चालताना मागून येणारे वाहने दिसत नाहीत. यामुळे कदाचित अपघात घडून मृत्यू होउ शकतो. म्हणून कालबाह्य ठरत असणा-या वाहनांचे नियम रद्द होण्यासाठी प्रयत्न व्हावा. आणि ‘राईट टू वॉक’ यावरही जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे, असे वाटते. वरील निवेदनावर तातडीने चर्चा होण्यासाठी अधिकारी, पोलीस प्रशासन, वाहतूक शाखा, लोकप्रतिनिधी आणि सूज्ञ नागरिकांसोबत बैठक घ्यावीत, अशी आग्रहाची विनंती आहे.
यासंदर्भात निवेदन देण्यासाठी पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा सौ. ममता मुदगुंडी, उपाध्यक्षा सौ. जमुना इंदापूरे, सहसचिवा सौ. ममता तलकोकूल, खजिनदार सौ. दर्शना सोमा, सदस्या सौ. लता मुदगुंडी, सौ. पल्लवी संगा आणि श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे समन्वयक किशोर व्यंकटगिरी उपस्थित होते.
———————————–