पारनेर शहरातील अनेक आजी माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

दत्ता ठुबे /पारनेर दि.२४
२२४ पारनेर नगर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात काल झालेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी ताई लंके यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रसंगी पारनेर शहरातील बाजारतळ येथे विराट सभा घेण्यात आली होती. या सभेत पारनेर शहरातील अनेक आजी माजी नगरसेवक यांनी खा. निलेश लंके यांना साथ देण्यासाठी पक्षात प्रवेश केला आहे. प्रवेश करणाऱ्यांमध्ये नगरसेविका तथा भाजपच्या शहराध्यक्ष विद्या गंधाडे, माजी पाणी पुरवठा,सभापती विशाल शिंदे,ऋषिकेश गंधाडे, नगरसेविका निता ठूबे, पारनेर ग्रामपंचायत सदस्या कल्पना शिंदे यांनी संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. खासदार नीलेश लंके व राणी ताई लंके यांनी त्यांचे स्वागत केले आहे. यावेळी नगराध्यक्ष नितीन अडसूळ,उपनगराध्यक्ष जायदा शेख,माजी उपनगराध्यक्ष सुरेखा भालेकर, पाणी पुरवठा,सभापती योगेश मते, नगरसेविका हिमानी नगरे, आदी मान्यवर उपस्थित होते.