राजूर च्या सर्वोदय विदयालयात मतदान जनजागृती अभियान संपन्न.

मतदान हा सुदृढ व सक्षम लोकशाहीचा पाया आहे-
केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव
अकोले प्रतिनिधी
मतदान आपला महत्त्वाचा हक्क व अधिकार आहे.प्रत्येक व्यक्तीचे मत खुप मौल्यवान आहे.सरकार बनवण्यात देशातील प्रत्येक मतदाराची भूमिका महत्वाची असते. म्हणूनच मतदान हे केवळ नागरी कर्तव्य नाही तर मतदान हा सुदृढ व सक्षम लोकशाहीचा पाया आहे.असे प्रतिपादन राजूर बिटचे केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी केले.
सत्यनिकेतन संस्थेचे गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय राजूर येथे मतदान जनजागृती अभियान संपन्न झाले.यावेळी मतदान जनजागृती करताना केंद्रप्रमुख श्री.जाधव हे प्रसारमाध्यमांसमोर बोलत होते.
यावेळी प्राचार्य बादशहा ताजणे,उपप्राचार्य दिपक बुऱ्हाडे,पर्यवेक्षक सदाशिव गिरी,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भिमाशंकर नाडेकर, नानासाहेब शिंदे,राजेविनोद साबळे,रवि देशमुख यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विदयार्थी उपस्थित होते.
केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी मतदान जनजागृती करताना प्रत्येक मत हे देशाचे भविष्य घडविण्याच्या दिशेने उचललेले महत्वाचे पाऊल असून लोकशाहीचे एक शक्तीशाली साधन आहे.स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. म्हणूनच लोकशाही मजबूत करण्यासाठी सार्वत्रीक निवडनुकांमध्ये मतदान टक्केवारी वाढणे गरजेचे आहे.त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी जागृकतेने आपल्या कुटूंबातील,परिसरातील,गावातील नागरीकांना आग्रहाने मतदान करण्यास प्रवृत्त करणे.त्यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणे, शंभर टक्के मतदान घडून आनणे यासाठी प्रयत्नशिल रहाण्याचे आव्हान केले. लोकशाही बळकटीसाठी
यावेळी विदयार्थी व शिक्षकांकडून प्रतिज्ञा म्हणून घेतले.केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव यांच्या संकल्पनेतून तसेच प्राचार्य बादशहा ताजणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात जनजागृतीसाठी घोषणा देऊन निबंध, चित्रकला तसेच फलकलेखन आदी उपक्रमांचे आयोजन केले होते.विदयार्थ्यांनी माझे मत देशासाठी यांसारखे पोस्टर तयार करून जनजागृती घडून आणली.