महाराष्ट्रात पोल्ट्री व्यवसायातून ४२ हजार कोटी ची दरवर्षी उलाढाल -अनिल खामकर

रायगड शेतकरी योद्धा कुकुटपालन सहकारी संस्थेचा चतुर्थ वर्धापन दिन साजरा
पेण / प्रतिनिधी
पोल्ट्री कुक्कुटपालन व्यवसाय शेती पूरक व्यवसाय असून भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा आहे.महाराष्ट्रातील ४२ हजार कोटी ची उलाढाल या व्यवसायात दर वर्षी होत आहे ती सतत वाढत चालली आहे
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यावसायिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल खामकर यांनी केले.

गेल्या चार वर्षापासून पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांच प्रश्न सातत्याने शासन दरबारी मांडत आहेत त्यातील बहुतेक मागण्या मान्य करून घेण्यात यश आले आहे विधानसभा निवडणुका आचारसंहिता संपल्या नंतर काही निर्णय होणे अपेक्षित आहे असेही ते म्हणाले हे निर्णय घेण्यास प्रशासनाने चालढकल केल्यास प्रसंगी न्यायालयात ही जाण्याची तयारी संघटनेने केली असल्याचे राज्य अध्यक्ष श्री अनिल खामकर यांनी सांगितले

शेतकरी योद्धा कुकुटपालन सहकारी संस्थेच्या चतुर्थ वर्धापन दिन सोहळा पेन( ता रायगड) येथे मोठ्या उत्सहात संपन्न झाला.शांताराम साळुंखे हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते या कार्यक्रमात श्री अनिल खामकर मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते
यावेळी श्री अनिल खामकर पुढे म्हणाले की यावेळी कुकुटपालन व्यावसायिक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ४ वर्षापासून संघटनेची स्थापना करण्यात आली आहे केंद्र व राज्य सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. संघटनेच्या एकजुटीमुळे ३६ जिल्ह्यात संस्था सक्षम काम करत आहे.

संघटनेतील सर्व पदाधिकारी व संचालक यांची सर्वांची चांगली साथ मिळत असल्या मुळे हे शक्य होत असल्याचे ते म्हणाले
यावेळी पेण तालुका अध्यक्ष स्वप्निल म्हात्रे यांनी
प्रास्ताविक करताना अध्यक्ष अनिल खामकर हे संघटनेतील अडीअडचणी सोडवण्याचे काम चांगल्या प्रकारे करत आहेत त्यांना संघटनेतील प्रत्येक प्रतिनिधी शेतकऱ्यांनी वेळात वेळ काढून सहकार्य करण्याचे आवाहन उपस्थितांना केले

महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा पोलादपूर जिल्हा संचालक शांताराम साळुंखे, महा. पो. यो सहसंघटक बाळासाहेब देशमुख, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष सर्जेराव भोसले, सहसचिव राजाराम गजरे, नाशिक जिल्हा संचालक ज्ञानेश्वर माकुणे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नंदकुमार चौधरी, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष शरद गोडांबे, मुंबई विभाग उपाध्यक्ष किशोर पाटील, महाड जिल्हा संचालक चंद्रकांत मालुसरे, महा. पो. यो. सचिव विलास साळवी, कोकण विभाग उपाध्यक्ष दीपक पाटील,विक्रम बेलोटे, खजिनदार मनोज दासगावकर, श्रीवर्धन जिल्हा संचालक अविनाश कोळंबेकर, खालापूर जिल्हा संचालक चंद्रहास बांदल, पेण तालुका अध्यक्ष स्वप्निल म्हात्रे, उपाध्यक्ष संतोष वाटाणे, खजिनदार विनोद बामगुड आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले
महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा व रायगड शेतकरी योद्धा यांचे पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सुभाष टेंबे यांनी केले.