सांगली विश्रामबाग रेल्वे जवळ नव्याने बांधण्यात आलेल्या वास्तूचे उद्घाटन

डॉ शाम जाधव
सांगली आज दिनांक २६/१०/२०२४ रोजी विश्रामबाग रेल्वे जवळ नव्याने बांधलेल्या नूतन वास्तूचे उद्घाटन सविता तिरूवडे व अनिता बोरखडे मामा यांच्या सुकन्या यांच्या अधिपत्याखाली नव्या वास्तूचे रूप सराव वस्ती विहार सांगली अध्यक्ष डॉक्टर सुधीर कोलप यांनी केले.
खजिनदार एस. आर. माने सर, सह खजिनदार जगन्नाथ आठवले, संचालक सी. बी. चौधरी बौद्धाचार्य दयानंद कांबळे हे उपस्थित होते. त्रिसरण, पंचशील, बुद्ध पूजा, संकल्पगाथा आशीर्वाद गाथा संपन्न होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. घेतो तो श्वास खातो तो घास आणि राहतो तो निवास हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच शक्य झालेली आहे.

त्यांच्यामुळेच आपला समाज उन्नत आणि शिक्षित संघटित होत आहे. आणि आपण नीसंकोचपणे आपल्या निवासस्थानी वास करीत आहोत. हीच सर्वात अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे .बाबासाहेबांनी दिलेल्या विचारावर आपण सर्वांनी आरूढ झाल्यास कोणीही मी प्रगती रोखू शकणार नाही. तो काही लोक बाबासाहेबांचे फक्त नाव घेऊन झोपेचे सोंग घेत आहे ही खेदाची बाब आहे. बाबासाहेबांचे विचार आचरणात आणणे आवश्यक आहे नुसते वल्गना आणि पोपटपंची करणे चुकीचे आहे सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली