इतर
शिर्डी मतदार संघात विखे ,घोगरे ,सदाफळ यांचे सह 8 अर्ज वैध

शिर्डी प्रतिनिधी : /संजय महाजन
शिर्डी मतदार संघात श्री.राधाकृष्ण ए.विखे पाटील, प्रभावती घोगरे,श्री.रामनाथ सदाफळ यासह इतर 8 उमेदवार यांचे अर्ज वैध ठरविले आहेत.रामनाथ सदाफळ हे वारकरी सांप्रदायातील अनुयायी ,विधितज्ञ,पत्रकार असे व्यक्तिमत्व असून ते सामाजिक कार्यकर्ते आहेत.अनेेक सामाजिक प्रश्न जाणून घेऊन प्रशासकीय स्तरावर जन आंंदोलना मुळे रामनाथ सदाफळ यानचा जनमानसात परीचय आहे.नगरपरिषद, ग्रामपंचायत, हद्दीतील अनेक. प्रश्न रामनाथ भाऊसाहेब सदाफळ शासन दरबारी मांडलेले आहे.निर्भीडपणे जनप्रशनावर लढणारे नेतृत्व म्हणून त्यान्ची ओळख आहेत रामनाथ सदाफळ याचां निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आज छानणी दरम्यान अर्ज मंजुर केला आहे.एकूण 15 उमेदवारापैकी 12,उमेदवाराचे अर्ज मंजूर झालेले आहेत. दिनांक 4.10.2024 रोजी दु.3 वा. वेळ अर्ज माघार घेण्याची असून त्यानंतर खरी रंगत निवडणूकीत येणार असल्याने शिर्डी मतदारसंघात कीती उमेदवार तग धरून राहतात हे मात्र येणारी वेळच सांगेल. या सर्व उमेदवारा मध्ये एक उमेदवार विधितज्ञ असल्याने मात्र नागरिकांचे लक्ष वेधले आहे