इतर

216-अकोले (अ.ज.) विधानसभा मतदार संघात छाननीत दोन अर्ज अवैध

खर्चावर निगराणीसाठी असलेल्या पथकांनी अत्यंत बारकाईने नोंदी घ्या निवडणुक निरीक्षकांच्या सुचना

सुनील गिते

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अनुषंगाने अकोले विधानसभा मतदार संघटब नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी दिनांक 22/10/2024 ते दिनांक 29/10/2024 (सार्वजनिक सुटटी व्यतिरिक्त) अधिसुचित करण्यात आला होता.

निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे दि. 30/10/2024 नामनिर्देशनपत्राची छाननी प्रक्रिया तहसील कार्यालय, अकोले येथे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अनुपसिंह यादव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे यांचे समक्ष पार पडली. यावेळी नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवार तसेच उमेदवार यांचे निवडणूक प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. भिवा रामा घाणे यांनी ०२ नामनिर्देशन पत्र दाखल केले होते त्यापैकी त्यांचा ०१ अर्ज व श्री. भास्कर किसन भांगरे यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे.

हे आहेत उमेदवार

श्री. पांडुरंग नानासाहेब पथवे, (राष्ट्रीय समाज पक्ष),

श्री. किरण यमाजी लहामटे,(नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), श्री. गणेश काशिनाथ मधे, (अपक्ष)

श्री. वैभव मधुकर पिचड, (अपक्ष,)

श्री. मारुती देवराम मेंगाळ, (अपक्ष),

श्री. मधुकर शंकर तळपाडे, (अपक्ष),

श्री. अमित अशोक भांगरे, (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) तसेच अपक्ष,

श्री. विलास धोंडीबा घोडे, (अपक्ष),

श्री. किसन विष्णू पथवे, (अपक्ष,)

श्रीमती शकुंतला भाऊसाहेब धराडे, (अपक्ष,)

श्री. भिवा रामा घाणे, (जय हिंद जय भारत राष्ट्रीय पार्टी)

व श्री. रामदास दत्तू लोटे, (अपक्ष) यांचे अर्ज छाननी अंती वैध ठरविण्यात आले आहेत.

तसेच छाननी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अनुपसिंह यादव यांनी उपस्थित उमदेवार यांना मतपत्रिकेवर छापावयाचे छायाचित्र किंवा नावाच्या वर्णलेखन (स्पेलिंग) अचुकतेबाबत कोणतीही सुधारणा करावयाची असल्यास तसा अर्ज दाखल करावा अशा सुचना दिल्या. छाननीमध्ये उपस्थित उमेदवार / प्रतिनिधी पैकी कोणीही कोणत्याही नामनिर्देशनपत्रावर आक्षेप घेतलेला नाही अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यादव यांनी दिली.

निवडणूक निरीक्षक श्री. हौलीनलाल गौईटे यांनी घेतला अकोल्यात निवडणूक कामाचा आढावा

अकोले (अ.ज.) विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयास केंद्रीय निवडणूक निरीक्षक श्री. हौलीनलाल गौईटे (भा.प्र.से.) यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.

अकोले विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अनुपसिंह यादव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सिद्धार्थ मोरे यांनी कामकाजा विषयी माहिती दिली.
केंद्रीय निरीक्षक यांनी निवडणुकीचे नोंदणी कार्यालय,
स्ट्रॉग रूम, एम.सी.सी, कंट्रोल रूम, साहित्य विभाग, सी.सी.टी.व्ही, आचारसंहिता कक्ष, मिडिया कक्ष आदींची पाहणी करून कामकाजा विषयी सूचना केल्या तसेच आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश दिले.

स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षिततेबाबत पोलीस पथकास सूचना दिल्या यावेळी निवडणुक नायब तहसीलदार दत्तू वाघ
निवासी नायब तहसीलदार किसन लोहारे, महसूल नायब तहसीलदार प्रमोद सावंत, नगरपंचायत
मुख्याधिकारी पंकज गोसावी तसेच इतर अधिकारी व पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.

निवडणूक निरीक्षक श्री. हौलीनलाल गौईटे (भा.प्र.से.) म्हणाले की, सर्व यंत्रणांनी सतर्कतेने काम करणे गरजेचे आहे. विशेषतः प्रचार सभा, मिरवणुका व कार्यक्रमांवर केल्या जाणाऱ्या खर्चावर निगराणीसाठी असलेल्या पथकांनी अत्यंत बारकाईने नोंदी घेताना व्हिडिओ शुटींग करावी. कुठल्याही पथकाच्या माध्यमातून अथवा चेकपोस्टवर कारवाई करताना, तपासणी तसेच कारवाई करताना निवडणूक आयोगाच्या अपेक्षेप्रमाणे फलनिष्पत्तीवर भर देण्यात यावा. निवडणूकीच्या निमित्ताने होणाऱ्या प्रत्येक अर्थविषयक बाबींवर अत्यंत सुक्ष्मपणे लक्ष पुरविण्याची गरज असल्याचे सांगून भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार वाहनांची तपासणी अधिक दक्षतापूर्वक करावी. पथकांनी त्यांना नेमून देण्यात आलेल्या जबाबदारीप्रमाणे प्रभावीपणे काम करावे. भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक गोष्टींची नोंद ठेवून सहाय्यक खर्च निरीक्षकांच्या संपर्कात राहावे. मतदारांना प्रभावित करण्यासाठीच्या रोकड, मद्य तसेच प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीस प्रतिबंध करावा. कारवाईमध्ये सातत्य ठेवावे. कामकाजाचा संपूर्ण आढावा घेतल्यानंतर केंद्रीय निवडणूक निरीक्षक श्री. हौलीनलाल गौईटे (भा.प्र.से.) यांनी अकोले विधानसभा निवडणूक कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्री. हौलीनलाल गौईटे यांच्याशी ८७८८४९१६४९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. त्यांचा मुक्काम सहयाद्री कक्ष, शासकीय विश्रामगृह संगमनेर येथे असणार आहे. निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणून अपर प्रवरा सब डिव्हीजनचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ७३५००७८८७७, ९९७०६२४०३५ असा असल्याचे प्रशासनातर्फे कळवण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button