इतर
योगी माधवनाथजी महाराज यांना रेखाचित्र भेट

शिर्डी प्रतिनिधी :/संजय महाजन
न्याहाळोद ता जि.धुळे येथील महंतयोगी मोतीनाथजी महाराज उत्तराखंड हरिद्वार रूडकी यांचे शिष्य सव्वासात वर्ष कुटिया मध्ये अखंड खडी तपश्चर्या करणारे,खडेश्वरी योगी माधवनाथजी महाराज यांना चित्रकार शिवाजी माधवराव पाटील यांनी त्यांचे रेखाचित्र दिवाळीनिमित्त भेट म्हणून दिले.
त्यावेळी आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मोतीलाल सोनवणे,चित्रकार शिवाजी पाटील,माजी सरपंच कैलास पाटील, राजू पाटील, श्याम खलाणे, सावता माळी, गोपाल माळी,हिरालाल महाजन, सोनू माळी,दीपक माळी,रवींद्र माळी,गौरव माळी,राजेंद्र माळी, कमलेश चौधरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.