सांगलीत भारतीय ब्लू पँथर च्या दणक्याने एसटी अधिकाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल!

डॉ. शाम जाधव
सांगली- एसटी महामंडळामध्ये वाहक (क्र १३६६८) या पदावर पलूस येथे कार्यरत असलेले कै दुशात गंगाराम बुळे हे प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत होते.
ते आदिवासी समाजातील असलेने त्यांचेवर सतत अधिकारी (तिकीट चेकर) अन्याय करत असे, त्यामुळे अधिकारी यांचे त्रासाला कंटाळून एसटी वाहकाने पलूस येथे राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेला जबाबदार धरून एसटी चे अधिकारी सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री जयदेव भास्कर सातुरकर, वाहतूक नियंत्रक श्री हणमंत रामचंद्र खरमाटे,व चालक श्री मोहन विजय कल्याणकर यांचेवर किरकोळ निलंबनाची कारवाई केली होती त्यापैकी एकाच अधिकाऱ्यावर पोलिसात गुन्हाही दाखल झाला पण भारतीय ब्लू पँथरने याला आक्षेप घेतला व अन्य दोन अधिकारी यांचे वरही मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून अॅट्रासिटी गुन्हा दाखल करावा व दुशात गंगाराम बुळे या एसटी वाहकाला आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या अधिकारी यांचे कडून त्याच्या लहान मुलांना ५० लाखांची मदत जाहीर करून मुलांचे पालकत्व एसटी ने स्विकारावे तसेच बुळे कुटुंबाच्या वारसांना न्याय दिला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या धरणे आंदोलन केले जाईल असा इशारा भारतीय ब्लू पँथर चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ नितिन गोंधळे व धनंजय खांडेकर यांनी दिला होता.

भारतीय ब्ल्यू पँथरच्या दणक्याने सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री जयदेव भास्कर सातुरकर, वाहतूक नियंत्रक श्री हणमंत रामचंद्र खरमाटे व चालक श्री मोहन विजय कल्याणकर यांचेवर पलूस पोलिस ठाण्यात एफ.आय.आर.क्र.०१९७/२०२४ नुसार अॅट्रासिटी अंतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच वरील अधिकारी यांचे वरही निलंबनाची कारवाई करणेत येवून भारतीय ब्लू पँथर ने मागण्या केल्या होत्या त्या सर्व मागण्या भारतीय ब्लू पँथर चे दणक्याने मान्य कराव्या लागल्या त्यामुळे भारतीय ब्लू पँथर चे कार्याची सर्व ठिकाणी चर्चा होत आहे.