राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेत जवळेबाळेश्वर आश्रम शाळेतील तीन विदयार्थी चमकले…!

अकोले प्रतिनीधी
-राज्यातील शिक्षकांसाठी ध्येय प्रकाशन संस्था नाशिक यांच्यातर्फे चालवण्यात येणाऱ्या “शिक्षक ध्येय” साप्ताहिक मासिकातर्फे दिपावलीनिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत शासकीय आश्रम शाळा जवळेबाळेश्वर ता.संगमनेर जि.अहिल्यानगर या शाळेतील 37 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
सदर राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त 14 नोव्हेंबर रोजी देशभर बालदिन साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधुन शिक्षक ध्येय मासिकाने जाहिर केला आहे. सदर स्पर्धेत शासकीय आश्रम शाळा जवळेबाळेश्वर ता.संगमनेर
या शाळेतील ब गटात सचिता भारत बुळे,साहिल राजेंद्र कौटे,वर्षा नानाभाऊ मेंगाळ या विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय बालचित्रकार पुरस्कार जाहिर झाला असुन
गणेश रामु परते,संतोष भाऊराव गिर्हे, व पुष्पा लिंबाजी केदार या विद्यार्थ्यांच्या चित्रांना बालदिनानिमित्त प्रसिध्द झालेल्या “शिक्षक ध्येय” मासिकात प्रसिध्दी देण्यात आली आहे.
बक्षिसपात्र विद्यार्थ्यांना ट्राॅफी व आकर्षक प्रमाणपत्र नाशिक येथे संपन्न होणाऱ्या जाहिर कार्यक्रमात लवकरच वितरीत केले जाणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे, सहा प्रकल्प अधिकारी दिपक कालेकर, नानासाहेब झरेकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक आदिनाथ सुतार, दिपक गुंडेकर, सुरेखा रासणे,व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल डामसे, उपाध्यक्ष सुनिताताई करवंदे,जवळेबाळेश्वरचे उपसरपंच अतुल कौटे,सोमनाथ करवंदे,भाऊसाहेब कौटे,बन्सी चिखले यांनी अभिनंदन केले आहे.तसेच यशस्वी विद्यार्थांना शाळेचे शिक्षक देवीदास रनमले, श्रीनिवास सुर्यवंशी, सुरेखा नाईकवाडी,श्रीगणेश पवार, सुरेखा गायकवाड, नितीन पायके,दिलीप धांडोरे,गणेश खतोडे,विजय लोहार, या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले होते,यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा परीसरात सर्वत्र अभिनंदन होत आहे.