रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फे झरी येथे आरोग्य शिबिर. २५० आदिवासिंची मोफत तपासणी

नाशिक दि १४
अतिदुर्गम भागामध्ये आदिवासी राहतात वैद्यकीय सेवा त्यांना सहज मिळत नाहीत , तसेच त्या सेवा घ्यायला खुप दूरवर पायपीट करावी लागते.वैद्यकीय सेवा जरी मिळाल्या तर त्या अपूर्ण राहतात, तसेच त्याचा खर्चही या आदिवासी बांधवांना न परवडणार असतो. हाच धागा पकडून रोटरी क्लब ऑफ नाशिक आणि सनय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झरी ( तालुका पेठ) या आदिवासी पाड्यांमध्ये मोफत आरोग्य शिबिर दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये अनेक प्राख्यात व निष्णात डॉक्टर्सनी विनाशुल्क सेवा दिली.
कर्करोग तज्ञ डॉ. नागेश मदनुरकर, दंतविकार तज्ञ डॉ.रचना चिंधडे व डॉ.हितेश बुरड, नेत्ररोग तज्ञ डॉ. स्वप्निल विधाते पोटविकार तज्ञ डॉ. महेश मंगूळकर , जनरल फिजिशियन डॉ. गौरी कुलकर्णी , बालरोग तज्ञ डॉ. अमोल चव्हाणके ,स्त्री रोग तज्ञ डॉ. सुमित कौर मेहता पाटील, एच आय व्ही / एड्स तज्ञ डॉ.भूषण सूरजूसे यांनी
या शिबिरामध्ये आदिवासी बांधवांची तपासणी करून पुढील उपचारां साठी मार्गदर्शन व समुपदेशन केले.

शिबिरास झरी येथील आदिवासी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 250 आदिवासी बांधवांची वैद्यकीय तपासणी मोफत करण्यात आली. या 250 तपासणीत 40 पेशंटला मोतीबिंदूचे शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, आठ ते दहा पेशंटला स्त्रियांच्या मासिक पाळी संलग्न आजारांवरती पुढे उपचार घ्यायला लागणार आहेत , तीन ते चार पेशंटला प्लास्टिक सर्जरी करायला लागणार आहे आणि जवळजवळ 50 रुग्णांना चष्म्याची गरज भासणार आहे. नुसते आरोग्य शिबिर न घेता त्यामधून जे काही रोगनिदान झाले आहे त्याचे पुढील उपचारासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक सहकार्य करणार आहे. रोटे. विजय दिनांनी यांनी शिबिरातील डॉक्टर्सनी लिहून दिलेली औषध सुध्दा रुग्णांना मोफत वितरित केली , देशपांडे आँप्टिशियन्स तर्फे संचालक श्री.मिलिंद देशपांडेनी रुग्णाची नेत्र तपासणी करुन मोफत चष्मे वितरित केलीत.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्व रोटेरियन,डॉक्टर्स , अध्यक्ष ओम प्रकाश रावत , माजी अध्यक्ष मंगेश अपशंकर, सचिव शिल्पा पारख , नियोजित अध्यक्ष डॉ.गौरव सामनेरकर , विजय दिनानी , सुधीर जोशी ,मंथ लीडर लीना बाकरे ,डॉ. साहेबराव राठोड ,मेडिकल डायरेक्टर आर्कि. मकरंद चिंधडे , सनय फाउंडेशनचे निलेश व धनश्री गायकवाड तसेच उर्मी दिनानी , मोना सामनेरकर, प्रदिप वट्टमवार , हृषीकेश संमनवार, विशाल गाला , रोहित देशपांडे तसेच सनय फाउंडेशन , पिंक फार्मसीचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेत शिबिर यशस्वीपणे पूर्ण केले
शिबिरा दरम्यान डॉ.रचना चिंधडे, डॉ.सोनाली चिंधडे आणि स्मिता अपशंकर या रोटेरेंअन्सनी आदिवासी बांधवांना शास्त्रोक्त पद्धतीने आपले हात कसे धुवावेत याचे प्रात्यक्षिक करून दाखवले, तसेच शास्त्रोक्त पद्धतीने दात कसे घासावेत याची माहीती देऊन त्यांना टूथपेस्ट , दात घासण्यासाठी लागणारे टूथब्रश , नेलकटर्सचे वाटप करण्यात आले.