सायखिंडी येथील मनोहर बाबा विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा!

संगमनेर- प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील सायखिंडी येथील श्री. मनोहर बाबा माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यालयातील योगशिक्षक संदीप सातपुते यांनी पुरक व्यायाम प्रकार, योगाप्रार्थना, योगासन प्रात्यक्षिके, ध्यानधारणा, पसायदान यांचे मार्गदर्शन केले. यावेळी विदयालयातील योगा व प्राणायाम मंचच्या वतीने चि.आदीत्य संदीप गोर्डे,चि. साईनाथ बाळासाहेब जोंधळे,
कुमारी आरती नवनाथ शिंदे, कुमारी समिक्षा संजय गांडोळे, ज्ञानेश्वरी प्रशांत गोफणे यांनी अतिशय अवघड आसने सादर केली.
श्री. मनोहर बाबा विद्यालय सायखिंडी येथे योगशिक्षक संदीप सातपुते हे सन 2000 सालापासून विद्यार्थ्यांना योगासने व प्राणायाम शिकवत असून विद्यार्थ्यांनी यापूर्वी राष्ट्रीय पातळीवरही यश मिळविले आहे.
आंतरराष्ट्रीय योगदिन कार्यक्रमास विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग , विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
