ओबीसी बाबत आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ अकोल्यात ना.जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्याची मागणी

अकोले प्रतिनिधी
– ओबीसी समाजाचा संघर्षाचा इतिहास नाही, त्यामुळे या समाजावर माझा फार विश्वास नाही असे ओबीसी समाजाबाबत वक्तव्य करणारे गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी अकोले तालुक्यातील ओबीसी समाज व बारा बलुतेदार समाजाने केली आहे.
आज अकोले तालुक्यातील ओबीसी समाज व बारा बलुतेदार समाजाच्या वतीने संजय गांधी योजनेचे नायब तहसिलदार गणेश माळवे यांना निवेदन दिले. तसेच सदर निवेदनाच्या प्रती राज्यपाल व तहलिदार यांना देखील देण्यात आल्या. निवेदनावर मच्छिंद्र मंडलिक, प्रमोद मंडलिक, बाळासाहेब वाकचौरे, रामदास पांडे, सौ.शारदा शिंगाडे, अनिल कोळपकर, देवीदास तिकांडे, नवनाथ पन्हाळे, संदिप गायकवाड, चंद्रकांत खर्डे, सखाहरी पांडे, दत्तात्रय मंडलिक, संतोष खांबेकर, इंद्रभान कोल्हाळ, समिर दोडे, दत्ता बंदावणे, नवनाथ पांडे, एन.टी.कदम आदींच्या सह्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे कि ना.आव्हाड यांनी जातीवाचक भाष्य करून आम्हा कष्टकर्यांचा जो अपमान केला करून इतर समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले. म्हणून ना.मुख्यमंत्री यांनी ना.आव्हाड यांचा राजीनामा घ्यावा. व ना.आव्हाड यांनी ओबीसी व बारा बलुतेदार समाजाची माफी मागावी अशी मागणी केली आहे.
राज्यातील ओबीसी आयोगाला निधी मजुर करूनही तो दिला गेला नसल्याने आयोगाला कामकाज करता आले नाही. महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्णतः स्थगित झाले आहे. असा अन्याय आघाडी सरकार करत असुन, दुसरीकडे मंत्रीपदावर कार्यरत असेलले ना.आव्हाड हे समाजाच्या विरोधात भाष्य करतात, त्यामुळे आघाडी सरकारमधील मंत्र्याची वृत्ती दिसुन येते.
सदर प्रकरणी ना.आव्हाड यांनी तमाम ओबीसी व बारा बलुतेदार समाजाची माफी मागुन मंत्री पदाचा व मंत्रीमंडळाच्या उपसमिती सदस्य पदाचा राजीनामा द्यावा. अन्यथा ओबीसी व बारा बलुतेदार समाज आपल्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून अन्य मार्गाने आंदोलन करेल असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.——-—-