
विलास तुपे
राजुर /प्रतिनिधी
आज राजुर येथे आनंदाचा शिधा वाटप माजी आ. वैभवराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे सर्वसामान्य सरकार आहे लोकशाच्या अनेक निर्णय सरकारकडून घेतले जात असल्याने सर्वसामान्य माणसाला त्याचा फायदा होत आहे असे प्रतिपादन उपसरपंच संतोष बनसोडे यांनी केले सरकारकडून देणारा येणारा आनंदाचा शिधा वाटपात शुभारंभ उपसरपंच संतोष बनसोडे व माजी उपसरपंच गोकुळ कानकाटे यांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी सदस्य ओंकार नवाळी,पवार मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते तसेच यावेळी कानकाटे म्हणाले की राज्यात सत्यत असलेले भाजप सेनेचे सरकार हे सर्वसामान्य माणसाच्या सरकार आहे त्यामुळे सामान्य माणसाच्या फायद्याचे अनेक निर्णय घेत आहे. महिलांना एसटी मध्ये प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान तसेच शेतकऱ्यांच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा धर्तीवर मुख्यमंत्री सन्मान योजना अशा अनेक चांगले योजना सरकारने सुरू केले आहेत असे ते म्हणाले. आज आनंदाचा शिदा घेण्यासाठी एकच गर्दी केली होती