रोटरी क्लब ऑफ नासिक आयोजित त्र्यंबक तालुक्यात पशु वैद्यकीय चिकित्सा शिबीर

सोमवार दि 25 नोव्हेंबर सकाळी 9.30 वा
आजचा हा नाविन्यपूर्ण व नवीन प्रकल्प रोटरी क्लबने ग् शेतकऱ्यांसाठी त्रंबक तालुक्यातील गणेशगाव विनायक नगर येथे आयोजित केला होता. क्लबचे नवीन मेंबर मंथ लीडर व्हेटर्नरी क्षेत्रातले तज्ञ रोटे.डॉ साहेबराव राठोड यांनी या प्रकल्पाची या वर्षी सुरुवात केली.

शेतकऱ्यांच्या पशूधनामध्ये वृध्दी होवून त्याची आथिर्क प्रगती व्हावी , शेतीपुरक व्यवसायातुन शेतकऱ्यांबरोबरच ईतर ग्रामस्थांना रोजगाराची संधी निर्माण व्हायची असेल तर पशुंच संवर्धन,त्यांची नियमीत तपासणी,लसीकरण, औषधांचा खूराक आणि पशू जननदरात सुधारणा होणं आवश्यक आहे.याच प्रकीयाचा एक भाग होता आजचं पशू वैद्यकीय शिबिर. महाराष्ट्र शासन पशू संवर्धन नाशिक विभागीय आयुक्त माननीय डॉ.बाबूराव नरवाडे , जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ.प्रशांत धर्माधिकारी , जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद नाशिक) डॉ.संजय शिंदे यांचे विशेष उपस्थिती व मार्गदर्शन लाभले होते

.मोठ्या प्रमाणात ग्रामीण आदिवासी शेतकरी व त्यांच्या पशुधन शेळी, गाय, बैल म्हशी यांच्या आरोग्य संबंधित समस्यांवर विविध डॉक्टरांनी मार्गदर्शन व व्हेटर्नरी प्रॉडक्ट करणाऱ्या कंपन्यां वेंकीज लाइव्ह स्टॉक डिव्हिजन पूणे, व्हिरबॅक अँनिमल हेल्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, अँस्पायर व्हेट शिंदेगाव नाशिक यांनीऔषध विनामूल्य दिली व त्याचा वापर केंव्हा , कधी आणि कसा करावा याची माहिती दिली. यामुळे या आदिवासी ग्रामीण शेतकऱ्यांच्या कृषी पूरक व्यवसाय व आर्थिक मदतीला फायदा होणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासन पशुधन विभाग जिल्हा परिषद त्रंबक तालुका अधिकारी डॉ.संतोष शिंदे , डॉ.योगेश मेहेरे उपस्थित राहिले त्यांनी मार्गदर्शन केले व रोटरीच्या उपक्रमाचे खूप कौतुक केले व हा उपक्रम सातत्याने यापुढेही आयोजित करावा यासाठी आमचं सहकार्य राहील हे मान्य केलं. या प्रकल्पासाठी रोटरीचे माजी अध्यक्ष रोटे.दिलीपसिंग बेनिवाल, प्रेसिडेंट इलेक्ट डॉ. गौरव सामनेरकर, रोटे. अमित पगारे उपस्थित राहिल्यामुळे प्रकल्पाची शोभा वाढली ,कृषी विज्ञान केंद्र,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे व्हेटर्नरी डॉक्टर श्याम पाटील यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
