इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि १९/०१/२०२३

[

🙏 सुप्रभात 🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष २९ शके १९४४
दिनांक :- १९/०१/२०२३,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०६,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:१४,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- उत्तरायण
ऋतु :- हेमंतऋतु
मास :- पौष
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- व्दादशी समाप्ति १३:१९,
नक्षत्र :- ज्येष्ठा समाप्ति १५:१८,
योग :- ध्रुव समाप्ति २३:०४,
करण :- गरज समाप्ति २३:४३,
चंद्र राशि :- वृश्चिक,(१५:१८नं. धनु),
रविराशि – नक्षत्र :- मकर – उ.षा.,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- मकर,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- अनिष्ट दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०२:०३ ते ०३:२७ पर्यंत,

लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:०६ ते ०८:२९ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:४० ते ०२:०३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दिपारी ०२:०३ ते ०३:२७ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०४:५१ ते ०६:१४ पर्यंत,

❀ दिन विशेष:
प्रदोष, त्रयोदशी श्राद्ध,
————–

दैनिक राशीभविष्य


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष २९ शके १९४४
दिनांक = १९/०१/२०२३
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)

मेष
आज जरासे आत्मपरीक्षण करा. कटू बोल हानी करू शकतात. चंद्र अष्टम स्थानातून विशेष कष्टदायक आहे. संतती नाराज राहील. गुरू अध्यात्मिक बाबीत रस निर्माण करेल. शनीचे लाभ स्थानातील वास्तव्य सुरू झाले आहे. दिवस मध्यम

वृषभ
आज घर आणि जोडीदार ही तुमची प्राथमिकता राहील. विशेष स्वच्छता, सजावट, खरेदी यात वेळ घालवाल. एकूण दिवस हा स्वतःकरता, कुटुंबाकरता वेळ देण्याचा आहे. व्यवसाय नोकरीसाठी शुभ दिवस.

मिथुन
आज मन काहीसे अस्थिर राहील. अष्टम स्थानावरील रवि मानसिक द्वंद्व निर्माण करतील. प्रकृतीचे त्रास वाढतील. व्यय मंगळ आहे खर्च आणि उत्पन्न याचा मेळ लागणार नाही. बंधू भेट आणि प्रवास संभवतो. मध्यम दिवस.

कर्क
आज पंचम स्थानावरील चंद्र स्वभावात आणि बोलण्यात विशेष गोडवा आणेल. कुटुंबात धार्मिक कार्यक्रम होतील. आर्थिक लाभ संभवतो. संतातीसुख आणि सामाजिक लाभ मिळतील. शुभ दिवसाचे फळ मिळेल.

सिंह
आज वैवाहिक जीवनात सुख तसेच कुटुंबात काही शुभ घटना घडतील. शनी चंद्र केंद्र योग आहे. मनात घालमेल होत असताना देखील इतर ग्रह मार्ग दाखवतील. गुरू कृपा होईल. दिवस शुभ.

कन्या
संतती चिंता, घरामध्ये काहीसे ताणाचे वातावरण असा हा दिवस आहे. तृतीय चंद्र भावंडांच्या बाबतीत काळजी लावेल. जपून असा. अष्टम राहू प्रकृती जपा असे सांगत आहे. दिवस मध्यम.

तूळ
अनपेक्षित घडामोडी, मित्र मैत्रिणींची भेट किंवा संपर्क आणि संततीसाठी विशेष घटना असा हा दिवस आहे. कामाचा लाभ मिळेल. आर्थिक दृष्ट्या चांगला दिवस.

वृश्चिक
आज ऑफिसमध्ये जास्तीची जबाबदारी येईल. वरिष्ठ अवलंबून राहतील. तिथे वेळ गेल्यामुळे घरामध्ये ताण निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. वैवाहिक जीवनात कलह टाळा. दिवस बरा.
हे वाचा – व्यक्तीचा मृत्यू कसा आणि कुठे होईल ? कुंडलीचे आठवे घर सांगते याचे रहस्य

धनू
घरामध्ये शुभ घटना, प्रवास, धार्मिक स्थळांना भेट असा हा दिवस आहे. व्यय चंद्र आर्थिक व्यय तसेच प्रकृती नाजूक ठेवेल. भावंडांची काळजी घ्या. शुभ दिवस.

मकर
आज सर्व तऱ्हेने आनंदी राहण्याचा दिवस आहे. राशीतील शनी पुढे गेला असून लाभ चंद्राचा मानसिक स्थिती वर उत्तम परिणाम होईल. बुध शुक्र व्यवसायात मदत करतील.पण एकूण सावध रहा. चांगला दिवस.

कुंभ
व्ययस्थ ग्रह गोचर अनुसार काळजीचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात कुरबुरी असतील. मात्र, फारसे अवघड जाणार नाही. गुरू मदत करील. व्यवसाय चांगला राहील. दिवस बरा.

मीन
प्रकृती आणि सामाजिक जीवनात कुरबुरी सुरू असतील तर आज जपून रहा. आर्थिक घडामोडी, निर्णय लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करा. भावंडाना त्रास होण्याचा काळ आहे. काळजी घ्या. दिवस मध्यम.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापू

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button