शासकीय अंधशाळेतील विद्यार्थ्यांना श्री राधिका फाऊंडेशन ची मदत

नाशिक प्रतिनिधी /डॉ शाम जाधव
आज दिनांक२९/११/२०२४ रोजी समाज कल्याण नासर्डी पुल नाशिक अंधशाळा या ठिकाणी श्री राधिका बहुउद्देशीय संस्था पंचवटी नाशिक यांच्यावतीने अंध विद्यार्थी यांना कार्ड शीट पेपर व्हाईट व सोनपापडी वाटप करण्यात आली
ह्या मुलांकडून ब्रेन लिपीतील अक्षरे कसे ओळखायचे एक ते दहा पाढे कसे करायचे वजाबाकी बेरीज गणिते कसे करायचे इंग्रजी अक्षराची जुळून कशी करायची हार्मोनियम वाद्य व नाल ( ढोलकी) त्यांच्या आनंदातून हार्मोनियम व नाल ( ढोलकी) सुरात गाण्यांचा उच्चार करून आनंद मिळाला हे मुलं दोन्ही डोळ्यांनी अंध असून त्यांना संगीताची वाचण्याची आवड निर्माण करून देणारे सर राज घाटे व्यवस्थापक यांचे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन लाभले
ही मुलं अगदी वयाने कमी असून नऊ दहा अकरा वर्षाचे असून त्यांना कलेची आवड जोपासण्यासाठी अथक परिश्रम घेणारे राज घाटे सर यांचा सिंहाचा वाटा होय अंदमान शिकवण व त्याला अंगीकृत कलेची जोपासना करण्यासाठी प्रवर्तकर्ण हा त्यांचा उद्देश होय त्यामध्ये श्री राधिका फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर चेतनाताई सेवक यांच्या मार्गदर्शनातून संस्थेचे पदाधिकारी या अंध विद्यार्थी शाळेला वारंवार भेट देऊन त्यांच्या आनंदात एकरूप होऊन आनंद घेतात

ही शासकीय अंधशाळा असून वेगवेगळ्या संस्था आपापल्या परीने संस्थेत भेटी देतात त्या मुलांचा आनंद हा आपला आनंद होय ह्या कार्यक्रमासाठी डॉक्टर चेतनाताई सेवक व डॉक्टर संदीप काकड, सौ मीनल ओतारी, डॉक्टर शाम जाधव सौ कल्पना जगताप व कर्मचारी वर्गांचा सहभाग लाभला श्री राधिका बहुउद्देश संस्थेचे पदाधिकारी यांचा सुद्धा आनंद गगनात मावेनासा झाला एक मूल आणि एक फुल सांभाळणं म्हणजे कठोर प्रयत्न करायला लागतात त्याच परिसरातून घाटे सर यांनी अंध विद्यार्थ्यांना वृत्त करून त्यांचे संगोपन करतात श्री राधिका बहुउद्देशीय संस्था ही एक कार्याची ओळख होय जिथे कमी तिथे आम्ही हे श्री राधिका बहुउद्देशीय संस्थेचे कार्य होय