इतर

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला आग, हजारो टन कचरा जळून खाक

श्रीगोंदा-श्रीगोंदा नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मोठी आग लागून हजारो टन कचरा जळून खाक झाला आहे. नगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन नीट होत नसल्याने घन कचरा सुरू असलेल्या डेपोच्या परिसरात नागरी समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. सोमवार, दि. 22 रोजी रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली.

या घटनेसंदर्भातील माहिती नगरपालिकेला समजताच अग्निशमन दल सज्ज झाले आणि पाण्याचे अंतर व कचरा पेटलेले अंतर 6 किलोमीटर असल्याने कचरा भिजवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. श्रीगोंदे नगरपालिकेमध्ये वर्षाला साधारण 3 कोटी रुपये घनकचरा व्यवस्थापन यासाठी खर्च केला जातो. रोजचा 10 टन कचरा संकलित होतो. साधारण 2 वर्षांचा कचरा असल्यामुळे हजारो टन कचरा जळून खाक झाला.

श्रीगोंदे नगरपरिषद ठेकेदारामार्फत हे सर्व काम करून घेत असते. ठेकेदाराचे काम शहरातील प्रत्येक घरातील कचरा गोळा करून त्याचे ओला आणि सुका कचरा वेगळा करून कचरा डेपोत नेला जातो. त्या ठिकाणी वर्गीकरण करून प्लास्टिक वेगळे केले जाते, मात्र असे काही या ठिकाणी दिसून येत नाही. मूळ ठेकेदार व त्यांचे कर्मचारी या ठिकाणी कधीच दिसून येत नाहीत. संभाजी ब्रिगेडची टीम एक महिन्यापूर्वी मुख्याधिकारींना भेटले. त्यावेळी चर्चा झाली. त्यामध्ये मुख्याधिकारी अभिजित ढोरजकर म्हणाले होते की, येथे आठ दिवसांत आम्ही प्रकल्प चालू करू, अशी चर्चा केली होती. तुम्ही प्रकल्प चालू न केल्यास आम्ही थोड्या दिवसांत घनकचरा व्यवस्थापन डेपोला टाळे ठोकण्याबाबत इशारा दिला होता.

संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्याला मुख्याधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे. या प्रकल्पाला 2017 साली मंजुरी मिळाली होती. 2023 म्हणजे 6 वर्ष झाली तरीही पालिका प्रशासनाचे घनकचरा डेपोकडे अक्षरश: दुर्लक्ष होत आहे. परिसरातील नागरिकांना प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे तसेच कचरा पेटल्यानंतर परिसरामध्ये श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत तसेच परिसरामध्ये कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. या परिसरामध्ये उग्र असा वास कायमस्वरूपी येत असतो तसेच शहरामध्ये कायमस्वरूपी प्लास्टिक बंदी करावी. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकल्पाला भेट दिली. या प्रकल्पाची कंपाउंड भिंत उंच करून देऊ, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. येत्या काळात नगरविकास मंत्री यांना पत्रव्यवहार करणार आहोत तसेच श्रीगोंदे नगर परिषदेने लवकरात लवकर हा प्रकल्प चालू न केल्यास संभाजी ब्रिगेड कचरा डेपो टाळे ठोको आंदोलन छेडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button