इतर

आमदार अमोल खताळ यांच्या विजयाचे श्याम जाजू यांनी केले कौतुक!

 संगमनेर /प्रतिनिधी

संगमनेर विधानसभा मतदार संघात40 वर्षाच्या एका बलाढ्य शक्तीला शह देत शेतकरी कुटुंबातील मुलगा आमदार झाला ही गोष्ट अभिमान आणि कौतुकास्पद आहे, असे भाजपाचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी म्हटले आहे

संगमनेर येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधतांना श्याम जाजू बोलत होते. यावेळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव एडवोकेट श्रीराज डेरे आदी उपस्थित होते.

जाजू म्हणाले की, विधानसभेला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 13 पैकी 11 जागा महायुती च्या आल्या आहेत संगमनेर येथे चाळीस वर्षाची एक हाती सत्ता असलेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात या दिग्गजाचा पराभव अमोल खताळ या सर्वसामान्य युवकाने केला खताळ यांचे त्यांनी कौतुक केले.

. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा उमेदवार उभा करण्यापेक्षा भाजपचा उमेदवार संगमनेर मध्ये उभा करू शकले नाही ? या प्रश्नावर ते म्हणाले पक्षाची स्ट्रॅटेजी असते आणि विशेष म्हणजे आम्ही सर्वजण एकाच युतीचे आहोत त्यामुळे कोण उमेदवार आहे यापेक्षा उमेदवार निवडून आणणे हेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आमची विचारधारा एक आहे आणि या विचारधारेत आम्ही यशस्वी झालो असेही ते म्हणाले.

पार्टी केडरमुळे शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात या तिघांनाही जनतेने नाकारले हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर दुसरीकडे आम्ही अजित पवार बरोबर आहोत हे लोकांनीच दाखवून दिले असेही जाजू म्हणाले.

संगमनेर येथे रुग्णालयाचा प्रश्न हा अत्यंत जिव्हाळ्याचा असून याबाबत आपण व्यक्तिगत लक्ष घालून तो मार्गी लावू तसेच नाशिक संगमनेर पुणे , रेल्वे मार्गाचा प्रश्न सोडविण्याचा खात्रीशीर प्रयत्न करू या मार्गावर येणाऱ्या तांत्रिक अडचणी याची आपण योग्य दक्षता घेऊनच निर्णय घेऊ असेही ते म्हणाले.

माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू हे संगमनेर येथील रहिवासी असून आता ते दिल्लीत स्थायिक झाले आहेत. जाजू यांनी येथील बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. . एवढेच नव्हे तर गल्ली ते दिल्लीचा राजकीय जीवन प्रवास विशद केला. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचीही आठवण त्यांनी आवर्जून सांगितली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button