बाळेश्वर आश्रमशाळेचे कार्य गौरवास्पद – नंदकुमार झावरे पाटील

संगमनेर दि 12
. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री बाळेश्वर आश्रमशाळा सारोळेपठार तालुका संगमनेर येथील आदिवासी विद्यार्थिनींच्या नूतन वसतिगृह इमारतीचे व ३५०० स्केअर फुट बहुउद्देशीय हॉलचे तसेच आश्रमशाळा कार्यालयाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार श्री. नंदकुमार झावरे यांच्या शुभहस्ते व संस्थेचे उपाध्यक्ष श्री रा.ह. दरे , सहसचिव अॅड . श्री विश्वासराव आठरे पाटील , विश्वस्त अॅड. दिपलक्ष्मी म्हसे , श्री सिताराम पाटील खिलारी , डॉ श्री सी.के.मोरे ,सौ अर्चना राजेंद्र मोरे व सारोळेपठार च्या सरपंच श्रीमती अहिल्याताई घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य सी.आर. शिरोळे यांनी आश्रमशाळेस संस्थेने मुलींसाठी स्वतंत्र सुसज्ज वस्तीगृह इमारत , ३५०० स्क्वेअर फुट बहुउद्देशीय हॉल, संस्थेच्या मालकीची विहिर खोदून कायमस्वरूपी पाणी पुरवठयाची योजना निर्माण केल्याबद्दल व गरम पाण्यासाठी व विजेसाठी सोलर उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे आभार मानले .
याप्रसंगी बोलताना सहसचिवअॅड विश्वासराव आठरे साहेब यांनी कोरोना कालावधीत शाळेने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच ही आश्रम शाळा संस्थेच्या सर्व शाखा शाळांसाठी व समाजासाठी मार्गदर्शक असेल असे गौरवोद्गार काढले.
अध्यक्षीय भाषणात सर्वांना संबोधित करताना माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी कोरोना महामारीमुळे प्रथम लॉक डाऊन लागू झाल्यावर वाहतुकीचे सर्व मार्ग बंद असताना शाळेत शिकत असणाऱ्या ४७५ निवासी विद्यार्थ्यांना सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या साधनाने सुखरूप घरी पोहोच केले. तसेच आपल्या विद्यार्थ्यांची होणारी उपासमार पाहून आश्रमशाळेने किराणा व धान्य किट तयार करून नाशिक ,त्र्यंबकेश्वर दिंडोरी पर्यंत पोहोच केल्याबद्दल व शेताच्या बांधावर जाऊन, वाड्या वस्त्यांवर जाऊन, आदिवासी विकास विभागाचा ‘शिक्षण सेतू अभियान’ व शालेय शिक्षण विभागाचा ‘ब्रिज कोर्स’ याची सर्व शिक्षकांनी प्रभावीपणे अंमलबजावणी केली. विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन अध्यापन करून, शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवले. आदिवासी समाजासाठी असणाऱ्या खावटी अनुदानाचे सर्वेक्षण करून अनुदान वाटप केले. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या या संस्थेचा व छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा या आश्रम शाळेतील माझ्या सर्व सेवकांनी जपला.खऱ्या अर्थाने हे शिवाजी महाराजांचे खरे मावळे आहेत असे गौरवोद्गार काढले .
शाळेने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्राचार्य श्री शिरोळे सर. प्राथमिक मुख्याध्यापक श्री पवार व सर्व सेवकांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष श्री रा. ह. दरे तसेच ज्येष्ठ विश्वस्त दीपलक्ष्मी म्हसे मॅडम, श्री सिताराम खिलारी व डॉ.सी के मोरे यांनी संस्थेचे सेक्रेटरी . श्री.जी.डी. खानदेशे यांनी आश्रमशाळा विकासासाठी दत्तक घेऊन व स्वतः इंजिनिअर असल्याने सर्व भौतिक सोयी सुविधांनी युक्त पुणे-मुंबईसारख्या मेट्रो सिटी ला लाजवेल असे सुसज्ज व अद्ययावत शैक्षणिक संकुल निर्माण करून आदिवासींच्या विकासाचे एक मॉडेल स्कूल निर्माण केल्याबद्दल सेक्रेटरी यांचा गौरव केला . श्री नंदकुमार झावरे यांनी आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या गोड खाऊसाठी रू. १०००० / रोख स्वरूपात आश्रमशाळेचे प्राचार्य श्री शिरोळे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रवींद्र आगलावे सर व श्री राजेश सांगळे यांनी केले श्री अरुण धावणे यांनी आभार मानले याप्रसंगी प्राचार्य श्री शिरोळे सी.आर. ,प्राथ. मुख्याध्यापक श्री पवार एस.एम. आश्रम शाळेतील सर्व सेवक वृंद यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.