जवळे कडलग येथील गं.भा.हिराबाई रामचंद्र लांडगे यांचे निधन

.संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर पंचायत समिती माजी सदस्या तसेच संगमनेर महिला सोसायटीच्या चेअरमन जवळे कडलग येथील रहिवासी गं.भा.हिराबाई रामचंद्र लांडगे
यांचे वयाच्या ९३ वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले.
त्या माजी मंत्री बी.जे खताळ पाटील व भास्करराव खताळ पाटील यांच्या भगिनी तर जेष्ठ नेते गोकुळशेठ लांडगे व संगमनेर भाजपा तालुकाध्यक्ष वैभवराव लांडगे, उद्योजक दिलीप लांडगे, प्रांत कार्यालयातील लिपिक शर्मिला आंबरे, मंगल काळे, मीना दौंड, उज्ज्वला शिंदे, शिला पाटील यांच्या मातोश्री होत्या. त्यांचे मागे तीन मुले, पाच मुली, नातवंडे, पतवंडे, सुना असा मोठा परिवार आहे.
संगमनेर येथील अमरधाम येथे अंत्यसंकार करण्यात आली. यावेळी आमदार अमोल खताळ, भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू, राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, कार्याध्यक्ष दिलीप शिंदे, तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, जेष्ठ नेते वसंतराव देशमुख, प्रमोद राहणे, भाजपा नेते डॉ. अशोक इथापे, भाऊसाहेब वाकचौरे, रवींद्र थोरात, यशवंत आभाळे, संजय मोरे आदी नी श्रद्धांजली व्यक्त केली.