महाराष्ट्राचा मास लीडर अन खरा चाणक्य : देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचा मास लीडर अन खरा चाणक्य :
देवेंद्र फडणवीस
‘मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना। मैं समंदर हूँ, लौटकर फिर आऊँगा’. हे वाक्य २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा युतीला बहुमत मिळवून ही फडणवीसांना विरोधी पक्षात बसावं लागलं. त्यावेळी विरोधी पक्षनेता म्हणून भाषण करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. आता तेच शब्द आज फडणवीसांनी खरे करून दाखवले. दोन वेळा आलेली मुख्यमंत्री पदा ची संधी सोडायला लागली तर एखाद्या ची काय अवस्था होऊ शकेल? एक तर त्याला राजकारणातून संपवला जाईल किंवा त्याला कुठेतरी कोपऱ्यात फेकून दिलं जाईल. याच गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीतही करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण जिद्द, संयम आणि राजकीय डावपेचाच्या जोरावर फडणवीस तरले आणि राजकारणाच्या सारीपाटावर पुन्हा झळाळून उठले. ‘मी पुन्हा येईन’ असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस खरोखरच पुन्हा आले. आता ते महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील.
अभ्यासू वृत्ती, कुशल वक्ते, विविध विषयांचा व्यासंग असलेले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटणवारे युवा राजकारणी म्हणजे देवेंद्र फडणवीस. नगरसेवक ते कमी वयातील महापौर, आमदार ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री म्हणून देखील सर्वोत्तम कामगिरी केली आहेत. गेले दीड दशकभर देवेंद्र फडणवीस हे नाव राज्याच्या सत्तापटलावर या ना त्या कारणांमुळे गाजत आहे.
निष्कलंक, चारित्र्यसंपन्न आणि आपल्या कामाप्रति प्रामाणिक असणारा हा लोकनेता गेली अर्धदशक पूर्णपणे महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि सत्ताकारणाचा एकमेव केंद्रबिंदू ठरत आहे. राज्यातील ठाकरे यांना ला धोबीपछाड देऊन मनाचा मोठेपणा ठेऊन शिंदे यांना मुख्यमंत्री तर शरद पवार सारख्या मातब्बर नेत्याला चितपट करून अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याची किमया करणाऱ्या चाणक्याचे नाव देवेंद्र फडणवीस आहे.
नागपूर शहरात भाजपला सत्तेवर आणण्यासाठी आपले शीर्षस्थ नेते नितीनजी गडकरी यांच्या खांद्याला खांदा लावून घेतलेले परिश्रम देवेंद्रजी फडणवीस यांना महापौर पदाच्या रुपात फळाला आले. वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी ते राज्यात सर्वात तरुण महापौर म्हणून पुढे नावारुपाला आले.
एक धुरंदर नेता म्हणून त्यांचे मला सर्वांत जास्त आवडणारे गुण म्हणजे हजरजबाबीपणा, जबरदस्त वक्तृत्व, एखादा विषय मांडण्याची हातोटी, राज्यभर अफाट दौरे, प्रचंड जनसंपर्क आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे ‘स्व’ पक्षात असो किंवा विरोधकांच्या गोटात, पुढच्या क्षणाला काय होणार आहे ह्याचा त्यांना बहुतांश वेळा येणारा अचूक असा अंदाज, प्रत्येक क्षणी विरोधकांच्या डावाला प्रतिडाव टाकण्याची असणारी त्यांची चाणाक्ष बुद्धी. देवेंद्र फडणवीस यांची अफाट आणि अचाट कार्यक्षमता भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्याही नजरेत भरली आणि पुढे ते महाराष्ट्र राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष झाले. अर्थात त्यावेळी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी आणि विरोधकांना एक सक्षम पर्याय म्हणून एक अभ्यासू, आक्रमक वक्तृत्व असलेले शालीन नेतृत्व यादृष्टीने भाजप पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतलेला होता.
पक्षश्रेष्ठींचा निर्णय सार्थ ठरवत देवेंद्रजींनी २०१४ च्या विधानसभा निवडणूक प्रचारात पक्ष प्रतिमेला साजेसा पण अतिशय आक्रमक पवित्रा घेतला होता. एकीकडे २५ वर्षे जुनी युती तोडून शिवसेना प्रमुख विरोधी पक्ष म्हणून समोर उभी ठाकली असताना दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीला भुईसपाट करत सेनेला त्यांनी केलेली चूक दाखवत महाराष्ट्रात पक्षाला ‘न भूतो न भविष्यति’ असे यश मिळवून दिले. राजकीय विश्लेषक भलेही त्यावेळच्या मोदी लाटेचा उल्लेख करतील पण देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र हे समीकरण जनतेला त्यावेळी मनस्वी पटलेले होते. त्यामुळेच महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचे १०० च्या वर आमदार निवडून आले. तोच पराक्रम त्यांनी २०१९ विधानसभेला दाखवून पुन्हा एकदा राज्यात भाजपाची शंभरी पार केली. त्यापूर्वी २०१९ लोकसभेला देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांची सत्ता आणण्यासाठी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याची सर्वस्वी जबाबदारी घेऊन प्रत्येक मतदारसंघात वैयक्तिक लक्ष घालून अतिशय चाणाक्षपणे यंत्रणा हाताळण्याची कामगिरी सुद्धा देवेंद्रनी केली. अन आता 132 आमदार निवडून आणण्याची कला केली.
मित्र पक्षाने चालवलेली अडवणूक, समोर शरद पवारसाहेब यांच्यासारखा बलाढ्य विरोधक या साऱ्या प्रतिकूलतेवर मात करत देवेंद्रजी फडणवीस यांनी अत्यंत मुत्सद्दी आणि धोरणीपणे राज्य प्रगतीपथावर नेण्यासाठी कोणत्याही प्रश्नावर तात्पुरती मलमपट्टी न करता दीर्घकालिन उत्तर शोधण्यावर परिश्रम घेतले.
आज राज्यात विविध पक्षांमध्ये अनेक महारथी, धुरंधर नेते सक्रिय आहेत आणि त्या सगळ्यांना आपले मुख्य विरोधक हे फक्त देवेंद्र फडणवीस हेच वाटतात हे एक पण एक मुरलेला राजकीय नेता कधीही अशा प्रकारच्या टिकेला कुठलीही भीक न घालता असल्पा तमाशाकडे ढुंकून ही बघत नाही. मग ते नरेंद्र मोदी असोत की देवेंद्र फडणवीस असोत… पण विरोधकांच्या अशा कपटी, द्वेषी आणि विकृत टीकांना मात्र देवेंद्र फडणवीस हे अजिबात विचलित न होता, सर्वसामान्य जनतेत नेहमीप्रमाणे जाऊन केल्या गेलेल्या सर्व टीकाटिपण्णी सकारात्मकतेमध्ये बदलवून उत्तर देतात. महाराष्ट्रासारख्या थोर परंपरा आणि भौगोलिक विविधता असलेल्या, प्रशासकीयदृष्ट्या कारभार करण्याबाबत अवघड अशा राज्याचे नेतृत्व करणे हे येरा गबाळ्याचे काम नव्हे आणि म्हणूनच वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी ही अवघड जबाबदारी अगदी लीलया पेलत महाराष्ट्र
प्रकारे त्यांचे यशच आहे.
त्यातही त्यांना घराघरात पोहोचवायच्या कामात मात्र विरोधकांच्या विविध सोशल मीडिया टिम नी रावून अधिकचा हातभार लावलेला आहे… त्यासाठी त्या सर्व विरोधी पक्षांचे आभार..!! विरोधक काय करतील…??
देवेंद्र फडणवीस यांना ते ब्राम्हण आहेत म्हणून हिणवतील, ते एका रुपयांचा भ्रष्टाचार करू शकले नाहीत, त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे कधीही कुठेही सापडत नाहीत म्हणून चिडवतील, त्यांनी आपल्या सुविद्य पत्नीला बळजबरीने घरी बसवून ठेवले नाही म्हणून त्यांना नावे ठेवतील..
५ वर्षे मुख्यमंत्री म्हणून राज्य कारभार हाकताना देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सम्राटाच्या भूमिकेत न राहाता चाणक्याच्या बुद्धीमत्तेतून कारभार केला. विरोधी पक्षांनी सातत्याने मार्गात उभे केलेले अडथळे, पक्षांतर्गत छुपे काय, करतील काय विरोधक मित्र…?? देवेंद्र फडणवीस यांच्या शरीर यष्टीवर बोलतील? विविध नावांनी त्यांची हेटाळणी करतील? स्वतःला प्रसिद्धी मिळावी म्हणून कारण नसताना त्यांच्या पत्नीला टीकेचे लक्ष्य करतील…??
राज्याच्या आजवरच्या मुख्यमंत्र्यांच्या मांदियाळीत आपले अनोखे वेगळेपण अधोरेखित करायला लावणारे देवेंद्र हे ‘एकमेवाद्वितीय’ ठरतात. ज्याप्रमाणे कोंबडे झाकल्याने सूर्य उगवायचा राहत नाही त्याच प्रमाणे सर्व विरोधकांच्या छाताडावर पाय देऊन देवेंद्र फडणवीस एकना एक दिवस परत एकदा मुख्यमंत्री होतील हे भाकीत खर ठरलं..
शेवटी एवढेच सांगन की, राजकारण म्हणजे करिअर समजून काम करणाऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वगुण हे ‘दीपस्तंभ’ आहेत. खरं सांगायचं झालं तर शेतकऱ्यांना सर्वांत मोठा आधार देवेंद्रजी होता.
मग तो जलयुक्त शिवार, विंधन विहरी, कर्जमाफी, फेडरेशनमार्फत तूर खरेदी, मुबलक प्रमाणात यूरिया, माफक दरात द्विप योजना, दूध खरेदीत दर वाढ, २५ टक्के नुकसानीला १०० टक्के पीक विमा, १ रुपयात पिक विमा ग्रामीण भागात सरकारच्या वत्तीने प्रत्येक पिकाना दीड पट हमीभाव, या अशा निर्णयाने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थान उभारी मिळाली, अन् शेतकरी खुशही होता. मराठा आरक्षण देणारा व टिकवणारा देवेंद्रच, अण्णासाहेब पाटील महामंडळ व सारथोच्या माध्यमातून करोडो रु चा निधी देऊन विध्यार्थ्यांना व छोट्या उद्योगांना भरारी, आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजकांना भरघोस अर्थसहाय्य व्हावं या हेतूने वैयक्तिक कर्जव्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजना, शेतकरी कुशल योजना या चार योजनांचा लाभ सामान्य लोकांना झाला, मुख्यमंत्री वैधकीय सहाय्यता कक्ष स्थापन करून राज्यातील गोरगरीब रुग्णांना जीवदान देण्याचं काम, महिलांना अर्थ तिकिट, शेतकरी सन्मान निधी असे कित्येक कामे सांगता येईल. लाडकी बहीण योजना राबवून महाराष्ट्रात क्रांती केली अन प्रचंड बहुमताने सरकार आले.
महाराष्ट्राच्या या लाडक्या लोकनेत्याला मुख्यमंत्री पदासाठी मनःपूर्वक शुभेच्छा…! उदंड निरोगी आयुष्य देवो आणि येणाऱ्या प्रत्येक दिवशी यशाची नवनवी शिखर गाठण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना…!!
संकलन व शब्दांकन
भाऊसाहेब वाकचौरे पाटील
जिल्हा संयोजक भाजपा,
सोशल मीडिया सेलउत्तर नगर जिल्हा