कोतुळ येथील पाच कोटीच्या विकास कामांचे आमदार लहामटे करणार भूमिपूजन!

कोतुळ प्रतिनिधी
आमदार किरण लहामटे यांचे विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या कोतुळ येथील पाच कोटी रुपये खर्चाचे विकास कामांचा शुभारंभ होणार आहे
मंगळवार दि. ०५ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० वा.आमदार डॉ. किरण लहामटे यांचे शुभहस्ते व अगस्ति सह. साखर कारखाना अकोले चे चेअरमन जेष्ठ नेते सिताराम पाटिल गायकर व .श्री कोतुळेश्वर देवस्थान ट्रस्ट, चे अध्यक्ष सुरेशराव कोते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे
कोतुळ टोलारखिंड राज्यमार्ग २२२ (रा.मा.६५) या रस्त्यावरील
(एस.टी. स्टॅण्ड ते दत्त मंदिर रस्ता काँक्रिटीकरण करणे ३ कोटी ५० लक्ष रु. व
जामगाव कोतुळ ब्राम्हणवाडा रस्ता (राज्यमार्ग २३ ) वरील
( कोतुळ ग्रामपंचायत चौक ते खटपटनाका रस्ता काँक्रिटीकरण करणे -१ कोटी ५० लक्ष रु.) या कामांचा शुभारंभ होणार आहे या प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन
.सरपंच भास्कर गोविंद लोहकरे उपसरपंच संजय पांडूरंग देशमुख ग्रामविकास अधिकारी शरद वाविकर तसेच सर्व सदस्य,ग्रामपंचायत कोतूळ व समस्त ग्रामस्थ कोतूळ यांनी केले आहे
——–