इतर

नेप्तीत दत्त जयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह.

अहमदनगर – नगर तालुक्यातील नेप्तीत अखंड हरिनाम सप्ताह. येथील चौरे मळ्यातील दत्त मंदिर येथे दत्त जयंती निमित्त गुरुवर्य प.पू.वै. धुंडा महाराज यांच्या आशीर्वादाने चौरे परिवार , दत्त सेवा मंडळ व ग्रामस्थ यांच्यावतीने सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे दि. ८ डिसेंबर ते दि. १५ डिसेंबर दरम्यान आयोजन केले असल्याची माहिती रामदास फुले यांनी दिली .


ह.भ.प. देवराम महाराज फुले यांच्या हस्ते दि.८ डिसेंबरला सकाळी ९ वा. कलश स्थापना होऊन सप्ताहाची सुरुवात होणार आहे.तसेच या सप्ताहात रोज ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सकाळी ८ ते ११ व दुपारी २ ते ४या वेळात ह. भ .प .शंकर महाराज कदम व त्यांचे सहकारी करणार आहेत. हे सप्ताहाचे ४१ वे वर्ष असून या सप्ताहात पहाटे ४ वा. काकडा भजन, सकाळी ८वा. विष्णूसहस्रनाम ,सकाळी १० वा. गाथा भजन, रात्री ९ते ११ या वेळात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या सप्ताहात आपली सेवा देणार आहेत. रविवार दि. ८ डिसेंबरला रात्री ९ ते ११ या वेळात ह .भ.प .देविदास महाराज अडभाई चांदा ता. नेवासा यांचे कीर्तन होईल, दि. ९ रोजी ह. भ .प .सचिन महाराज पुंड शिंगवे तुकाई ,दि. १० रोजी ह. भ .प .गणेश महाराज कुदळे चिचोंडी शिराळ, दि.११ रोजी ह. भ. प. प्रेमानंद महाराज शास्त्री वडगावकर, दि. १२ रोजी ह. भ. प. राऊत दादा महाराज पिंपळा ता. आष्टी, दि.१३ रोजी हरिभाऊ महाराज भोंदे पिंपळगाव माळवी ता.अहिल्यानगर, शनिवार दि.१४ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळात ह .भ .प.मुकुंदकाका महाराज जाटदेवळे यांचे दत्त जन्माचे कीर्तन होईल .

तसेच ६ ते ८ या वेळेत पालखी सोहळ्याचा कार्यक्रम होईल .रात्री ९ ते११ या वेळेत ह .भ.प.दिनकर महाराज आचवले यांचे किर्तन होईल. रविवार दि. १५डिसेंबरला ह. भ .प.बाळकृष्ण महाराज कांबळे ताराबाद ता. राहुरी यांचे काल्याचे किर्तन सकाळी १० ते १२ या वेळेत होईल व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तरी परिसरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन चौरे परिवार व दत्त सेवा मंडळाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button