शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा चौफुल्यावर उपोषणाचा आठवा दिवस

इतिहासाची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही – शिवशाहीर कल्याण काळे
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
आमचा इतिहास सांगतो की गड आला पण सिंह गेला होता. आता मात्र गडही पाहिजे आणि सिंह पाहिजे म्हणजेच आम्हाला इतिहासाची पुनरावृत्ती नको आहे. यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या भावनांचा विचार करून औषध उपचार घ्यावेत व उपोषण चालवावे असे मत शिवशाहीर कल्याण काळे यांनी मांडले.
शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा चौफुल्यावर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव व जोहरापूरचे माजी सरपंच अशोक देवढे यांच्या आमरण उपोषणनाचा आजचा पाचवा दिवस तर साखळी उपोषणाचा आठवा दिवस आहे. यावेळी समाज जनजागृती कार्यक्रमात शिवशाहीर कल्याण काळे त्यांचे सहकारी राष्ट्रीय भारूडकार हमीद सय्यद व शिवशाहीर अक्षय डोंगरे यांचा पोवाडयाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी त्यांनी पोवाड्याच्या माध्यमातून जनजागृती करून जरांगे पाटलांना औषध पाणी तरी घ्या अशी भावनिक साद घातली. आरक्षणाचा प्रश्न सुटल्यानंतर अंतरवाली सराटीला मराठ्यांची पंढरी म्हणून ओळख मिळेल व त्या पंढरीचा पांडुरंग मनोज जरांगे पाटील असेल.असेही मत त्यांनी मांडले.
यावेळी कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे, प्रहारचे शेवगाव तालुका अध्यक्ष रामजी शिदोरे, शेतकरी बचाव जन आंदोलनाचे एकनाथ काळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मच्छिंद्र आर्ले, भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर, जलभूमीचे बाळासाहेब जाधव, भायगावचे माजी सरपंच अशोक दुकळे, प्रहारचे तुकाराम शिंगटे, भगवान आढाव, पत्रकार शहाराम आगळे साखळी उपोषणा सहभागी आहेत.
यावेळी भातकुडगावचे माजी सरपंच राजेश फटांगरे, उपसरपंच विठ्ठल फटांगरे, भातकुडगाव विकास संस्थेचे अध्यक्ष सचिन फटांगरे,अनिल भेंडेकर,बाबूलाल पटेल, अण्णासाहेब दुकळे,डॉ. विजय खेडकर, कैलास लांडे, एकनाथ लांडे,डॉ. परवेज सय्यद,चंदु फटांगरे, डॉ.शाम काळे, राजेश लोंढे, गणेश शिंदे, भाऊराव फटांगरे, आजिनाथ लांडे,देवदान वाघमारे, कानिफनाथ घाडगे, ज्ञानेश्वर गर्जे, बाबासाहेब साबळे, लक्ष्मण फटांगरे सागर घुमरे पप्पु काळे प्रवीण गायकवाड आप्पा मरकड ऋषिकेश घनवट अमोल वडणे तुकाराम शिंदे लक्ष्मण आदींनी पाठिंबा दिला आहे. उपोषणा दरम्यान हरिचंद्र जाधव व राजेंद्र फाटके हे अधिक परिश्रम घेत आहेत. यावेळी शेवगाव पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
–
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार भातकुडगाव फाट्यावर चौफुल्यावर चालू असलेल्या शांततेतील उपोषण स्थळी शिवशाहीर कल्याण काळे व त्यांचे सहकारी यांचा जनजागृती साठी आयोजित पोवाड्याच्या कार्यक्रमात शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दिपक सरोदे, शेवगावचे तहसीलदार प्रशांत तांगडे,शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी उपस्थित राहून उपोषणकर्त्यांशी संवाद साधला.
शेवगाव पंचायत समितीचे मा. सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांनी भातकुडगाव फाटा येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव, जोहरापूरचे माजी सरपंच अशोक देवढे व साखळी उपोषणकर्ते यांची भेट घेऊन संवाद साधुन पठिंबा दिला.