इतर
राजापूर महाविद्यालयात प्रकृती चिकित्सा परीक्षण शिबिर संपन्न …….

संगमनेर प्रतिनिधी
दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी नूतन कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजापूर येथे विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत भारतीय चिकित्सा पद्धती आयुष मंत्रालय,भारत सरकार यांच्यावतीने प्रकृती चिकित्सा परीक्षण शिबिर उत्साहात पार पडले .यासाठी डॉ. डेरे आयुर्वेद महाविद्यालयाच्या काय चिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. स्वाती सोमण, डॉ.प्रियंका भडगर मॅडम आणि त्यांचा स्टाफ चिकित्सा परीक्षणासाठी उपस्थित होता. यावेळी डॉ. स्वाती सोमन यांनी प्रकृती चिकित्सा परीक्षणाची गरज यावर मार्गदर्शन केले. तर प्राचार्य डॉ. सुभाष कडलग यांनी या शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयातील संस्था पदाधिकारी ,प्राचार्य ,प्राध्यापक व विद्यार्थी यांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या शिबिरासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष कडलग यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिर यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.प्रविण आहेर व राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी प्रा. ओंकार थोरात यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाच्या शेवटी संस्था पदाधिकारी यांनी डॉ.डेरे महाविद्यलातील प्रा. डॉ स्वाती सोमन व डॉ.प्रियंका भडगर यांचा सत्कार केला व उपप्राचार्य वरपे यांनी आभार मानले .