श्री राधिका फाउंडेशन कडून जसोदाबाई सोनी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना १५० ब्लॅंकेट चे वाटप

नाशिक प्रतिनिधी
डॉ शाम जाधव
श्री राधिका फाऊंडेशन बहुउद्देशीय संस्था नाशिक संस्थापिका डॉक्टर चेतनाताई सेवक यांच्या विद्यमाने आयोजित कार्यक्रम शाखा निफाड शाखाध्यक्ष जयश्री भटेवरा यांच्या उपस्थिती मध्ये
निफाड आज दिनांक ५/१२/२०२४ रोजी श्री राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था शाखेकडून शालेय विद्यार्थी जसोदाबाई सोनी आश्रम शाळेत यांना १५० ब्लॅंकेट ते वाटप करण्यात आले थंडीचा उबदार सहारा मिळण्यासाठी श्री राधिका बहुउद्देश्य संस्थेचे एकच ध्येय मदतीचा हात पुढे गरजू अनाथ,कष्टकरी, हात मजूर, आपले घरे सोडून तंबूत राहणारे त्यांचा परिवाराचा विचार करणारे एकमेव संस्था श्री राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था सदैव मदतीचा हात पुढे करणारे जिथे कमी तिथे आम्ही ही राधिका फाउंडेशन चे उद्दिष्ट होय
त्यावेळी
जसोदाबाई सोनी आश्रमशाळा अध्यक्ष श्री राजाभाऊ शेलार,
माध्यमिक मुख्याध्यापक डोमसे सर,प्राथमिक मुख्याध्यापक कडलग सर, माध्यमिक शिक्षिका सौ पुष्पा घुले, निफाड शाखाध्यक्ष जयश्री भटेवरा सदस्य तनवीर राजे,मंगल शर्मा, प्रशांत भटेवरा मंगल भटेवरा उपस्थित होते