इतर

वनकुटे गावच्या शेतकऱ्यांचे खडकवाडी विद्युत उपकेंद्राच्या अधिकाऱ्यांना घेराव आंदोलन…

मुख्यमंत्री गावात येवूनही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटेना …

दत्ता ठुबे

पारनेर :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावात येवूनही पारनेर तालुक्यातील वनकुटे गावच्या शेतकऱ्यांच्या समस्या अद्यापही संपलेल्या दिसत नाहीत. पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई तर अद्याप मिळालेली नाहीच पण विजेचा खेळखंडोबाही शेतकऱ्यांच्या असलेल्या पिकांचे नुकसान करत आहे. साधारण एक महिन्यापासून शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नसल्याने अखेर खडकवाडी विद्युत उपकेंद्रावरील अधिकाऱ्यांना वनकुटे गावच्या शेतकऱ्यांनी घेराव घालून विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या भडीमाराने आणि सरबत्तीने अधिकारी गांगारून गेले. शेतकऱ्यांनी केलेल्या अनेक प्रश्नांनी अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. अखेर वरीष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि आंदोलन यशस्वीरीत्या संपले.

साधारण एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वनकुटे गावात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करुन गेले. तरीही कोणत्याही शेतकऱ्याला अद्यापही दिलासा मिळालेला नाही आणि मदतही मिळाली नाही. त्यावेळी आलेल्या वादळाने विजेचाही खेळखंडोबा झाला होता. मुख्यमंत्र्यांसमवेत आलेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ सर्व सुरळीत होईल असे सांगितले होते परंतु काहीही सुरळीत झालेले दिसत नाही. विजेचा लपंडाव असाच चालला तर आहे ती पिक आणि जनावरांचा चारा पण हाती लागणार नाही या भितीने शेतकरी हवालदील झालेले आहेत.

अजूनही विद्युत वितरण कंपनीने विजेचा प्रश्न व्यवस्थित सोडविला नाही आणि गावातील काही भाग अंधारात आहे. शेतकऱ्यांना पण कमी दाबाने विज पुरवठा होत आहे. तसेच गावातील पाणीपुरवठा पण त्यामुळे विस्कळीत झालेला आहे. तसेच गावातील लाईनमन तुषार शिंदे यांचा पण विद्युत लाइनवर काम करत असताना अपघात झालेला असून ते पुणे येथे उपचार घेत आहे.

त्यामुळे वनकुटे ग्रामस्थांनी पूर्णवेळ लाईनमन मिळावा, शेतकऱ्यांना पुर्ण दाबाने विज वितरित व्हावी तसेच विविध मागण्यांसाठी खडकवाडी येथील विद्युत उपकेंद्रावर अधिकाऱ्यांना घेराव घालून आंदोलन केले. आंदोलनाच्या दणक्याने अखेर विज वितरण कंपनीचे अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या व शेतकऱ्यांना दिलासा भेटेल असे आश्वासन दिले.

यावेळी माजी सरपंच राहुल झावरे, दिपक गुंजाळ, आदिनाथ ढवळे, दिपक खामकर, नारायण गागरे, बबन काळे, किरण शिंदे, दत्तू व्यवहारे, बाळासाहेब खामकर, गणेश खामकर, रामा साळवे, दादाभाऊ वाळूंज, पोपट डुकरे, निलेश औटी, पप्पू गिरी, विकास गागरे, बाळासाहेब बर्डे, योगेश गागरे, वसंत गागरे, माधव शेवंते, संदीप औटी यांसह वनकुटे गावातील अनेक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button