सांगवी सूर्या येथे पीर साहेब बाबांचा ऊरूस ला सुरुवात

दत्ता ठुबे
पारनेर – सालाबादप्रमाणे सांगवी सूर्या येथे पीर साहेब बाबांचा ऊरुस शनिवार दि . ७ पासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून सोमवार दि . ९ पर्यंत चालणार आहे .
हा ऊरूस हिंदू व मुस्लिम समाजाचे ऐक्य प्रतिक म्हणून ओळखले जाते . शनिवार दि . ७ रोजी सायंकाळी ८ . ३० वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराजां ची आरती , रात्री ९ वाजता पीर साहेब बाबांचा संदल व रात्री खास आकर्षण असलेला टाकळी ढोकेश्वर येथील माईल बॅन्जो पार्टी यांचा बहरदार वादयांचा कार्यक्रम संपन्न झाला , आज रविवार दि . ८ रोजी सकाळी ७ वाजता खास बैलगाडा शौकिनांसाठी भव्य बैलगाडा शर्यती होत असून यावेळी विजेत्या प्रथम क्रमांकाच्या गाडा मालकास ७१ हजार रुपये , व्दितीय क्रमांकास ५१ हजार रुपये बक्षीस ग्रामस्थांच्या वतीने , तर तृतीय क्रमांकास ३१ हजार रुपये सामाहिक , स्पर्धेत सर्वोच्च प्रथम क्रमांकाच्या गाड्यास एक दुचाकी , व्दितीय क्रमांकास एक वीजेवरील दुचाकी , तृतीय क्रमांका स एक एल सी डी टि व्ही , इतर घाटाचा राजा , फळी फोड गाडा व इतर वैशिष्ट्ये पूर्ण गाड्यासही रोख , वस्तू स्वरूपात बक्षीसे व चषक देवून सन्माननीत करण्यात येणार आहे .

रात्री १० वाजता तमाश्या शौकिनांसाठी प्रसिद्ध तमासगीर पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे . तर तिसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता लोकनाट्य तमाश्या च्या हजेरी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे , कुस्ती शौकिनांसाठी मोठ्या बक्षीसांवर नामवंत पहिलवानांचा कुसत्यांचा जंगी आखाडा ठेवण्यात आला आहे .
हा ऊरूस जत्रोत्सव यु ट्यूब वर दाखविण्यात येणार असून बैलगाडा स्पर्धेसाठी रोख २ हजार रुपयांचे टोकन ठेवण्यात आले आहे . हा ३ दिवसांचा उरूस जत्रोत्सव अत्यंत शांत व शिस्तबद्दरित्या पार पाडला जाणार असल्याची माहिती सांगवी सूर्या , माजमपूर ग्रामस्थ , नगर , मुंबईकर व पुणेकर मंडळी यांनी दिली आहे .