इतर

पारनेर शहर विकासा साठी आमदार काशिनाथ दाते यांनी भरघोस निधी द्यावा नगरसेवकांची मागणी

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी


२२४ पारनेर नगर विधानसभा मतदार संघात निवडून आलेले महायुतीचे उमेदवार आमदार काशिनाथ दाते ( सर) यांना पारनेर शहर प्रभागांतील मतदारांनी भरभरून मतदान केलेले आहे

. त्यामुळे पारनेर शहरातील नागरी सुविधांसाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शहरातील नगरसेवक अशोक चेडे,नगरसेवक विजय सदाशिव औटी,नगरसेवक युवराज पठारे, नगरसेविका शालुबाई ठाणगे,नगरसेवक नवनाथ सोबले यांनी केली आहे.
पारनेर बसस्थानक असुविधा, क्रांतिकारक सेनापती बापट स्मारक नूतनीकरण,डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक नूतनीकरण, खालच्या वेशीचे प्रवेशद्वार नूतनीकरण,पारनेर शहरातील नागरिकाचे रेशन कार्ड धारकांची समस्या,अद्ययावत क्रीडा संकुल, ग्रामीण रुग्णालय असुविधा, पारनेर शहरातील कायमस्वरूपी पिण्याचा पाण्याचा प्रश्न, आधार कार्ड केंद्र, पंतप्रधान आवास योजना घरकुले, दलित वस्ती सुधार योजना प्रकल्प,नगर पंचायत कचरा, पिण्याचे स्वच्छ पाणी, ड्रेनेज असुविधा, शहरातील वाढत्या नागरीकरणाचे प्रश्न, शहरातील व्यापारी व्यवसाय वृध्दी करण्यासाठी प्रयत्न, शहरातील धार्मिक बारा ज्योतिर्लिंग मंदिरे पर्यटन विकास, जिल्हा परिषद शाळां डिजिटल, स्पर्धात्मक परीक्षा केंद्र, कला प्रेमींसाठी नाट्यगृह, शासकीय व निमशासकीय कार्यालय मधील महिलांसाठी स्वच्छतागृह, शिवाजी पेठेतील व्यवसाय वृध्दी, पशुवैद्यकीय दवाखान्यात अद्ययावत माहिती सुविधा, शेतकऱ्यांसाठी जनावरांचा बाजार, कुस्ती स्पर्धा साठी अद्ययावत क्रीडा मैदान, महिला करिता अद्ययावत व्यायामशाळां, शहरातील मुख्य चौकात सीसीटिव्ही कॅमेरे, बाजार तळ येथे शेतकऱ्यांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी सुविधा, सरकारी कार्यालयात नागरिकांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी सुविधा, बाजार समितीत महिलांसाठीही स्वच्छतागृह, शेतकऱ्यांसाठी ना नफा ना तोटा तत्त्वावर झुणका भाकर, मुस्लीम बांधवा साठी स्वतंत्र स्मशानभूमी, गणपती बाप्पा विसर्जन बारवेचे नूतनीकरण, जागृत देवस्थान नागेश्वर मंदिर पर्यटन विकास, नाना नानी पार्क, स्विमिंग पूल, लहान मुलांसाठी खेळाचे मैदान,प्रभागातील रस्त्यांचे डांबरीकरण, शेतकरी बांधवांसाठी २४ तास वीज पुरवठा, शहरात उद्योग व्यवसाय वृद्धीसाठी यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन कॅम्प, बेरोजगार तरुणांना रोजगार हमी, इत्यादी कामांचा बॅकलॉग भरून काढण्याची मागणी शहरातील नागरीक करत आहेत.


पारनेर शहरातील सर्व प्रभागातील मतदारांनी भरभरून मतदान केलेले असल्याने आमदार काशिनाथ दाते सर यांनी शहर विकासासाठी १५ ते २० कोटी निधी उपलब्ध करून द्यावा.


नगरसेवक अशोक चेडे
नगर पंचायत, पारनेर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button