इतर

कोपरगाव तहसिल कार्यालयात वाळू वाहतूक दारांकडून घेतली जाते दरमहा लाच!

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी वाळू वाहतूक दारांकडून या पोटी दरमहा आर्थिक चिरिमिरी घेत आहे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या सापळ्यातून हे चित्र स्पष्ट झाले असून एका वाळू वाहतूक दारांकडून लाच घेताना विभागाचे कर्मचारी सापळ्यात अडकले आहे

याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे


’यशस्वी सापळा कारवाई’’
▶️ ’युनिट .’ नाशिक
▶️ ’तक्रारदार.’ पुरूष वय ३६ वर्षे
▶️1) आलोसे. श्री. चंद्रकांत नानासाहेब चांडे वय 39 वर्षे, व्यवसाय-नोकरी (लिपीक, वर्ग-3, तहसील कार्यालय, कोपरगाव) रा. कला साई, बंगला समयक नगर, कोपरगाव.423601
2) श्री. योगेश दत्तात्रय पालवे, वय -45, व्यवसाय- नोकरी (अव्वल कारकून वर्ग-3,तहसील कार्यालय, कोपरगाव)
3) खाजगी इसम- प्रतीक कोळपे उर्फ खाऱ्या, वय – 23, व्यवसाय – वाळू वाहतूक, रा – कोळपेवाडी, जिल्हा – अहिल्या नगर
▶️ ’लाचेची मागणी.’
15000/-
▶️ ’लाच स्विकारली.’
15000/-
▶️ ’हस्तगत रक्कम.’
15000/-
▶️ ’लालेची मागणी’
दिनांक ०६/१२/२०२४ रोजी
▶️ ’लाच स्विकारली’
दिनांक ०९/१२/२०२४ रोजी
▶️ तक्रार-
यातील तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून ते सदरील व्यवसायासाठी वापर करीत असलेल्या ट्रॅक्टर वर कारवाई न करण्यासाठी आलोसे क्रमांक 1) चांडे व आलोसे क्रमांक 2) पालवे यांनी आरोपी खाजगी इसम नामे प्रतीक कोळपे यांचे मार्फत तक्रारदार यास दरमहा 15 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे तक्रार केली होती. त्यावरून दिनांक ०६/१२/२०२४ रोजी पंचा समक्ष केलेल्या पडताळणी कारवाईत आलोसे क्र.१). चंद्रकांत चांडे यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली व मागणी केलेली लाचेची रक्कम खाजगी आरोपी इसम नामे प्रतीक कोळपे याचेकडे देण्यास सांगितले. त्यामुळे तक्रारदार यांनी खाजगी ईसम नामे प्रतीक कोळपे यास संपर्क केला असता त्याने आलोसे नामे चांडे यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम स्वीकारली. त्यानंतर आरोपी क्र. 2) पालवे व आरोपी क्र.१) चांडे यांना फोन द्वारे आरोपी क्रमांक 3) खाजगी इसम प्रतीक कोळपे यांनी १५,०००/- रु.लाचेची रक्कम स्वीकारले बाबत सांगितले असता आलोसे चंद्रकांत चांडे व आलोसे योगेश पालवे यांनी खाजगी इसम प्रतीक कोळपे यास सदर लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दिली.
आलोसे व आरोपी खाजगी इसम यांचे विरुध्द कोपरगाव शहर पोलीस स्टेशन पोलीस , जिल्हा अहिल्यानगर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम ७, ७ अ व 12 अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.
▶️ आलोसे यांचे सक्षम अधिकारी- मा. जिल्हाधिकारी,
जिल्हा अहिल्यानगर
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ ’ सापळा अधिकारी .
श्री संतोष रवींद्र पैलकर , पोलीस उपधीक्षक ला. प्र. वि. नाशिक मोबा नं. ९८२३१०३१०२
▶️ सह सापळा अधिकारी.
श्री संदीप घुगे,
पोलीस निरीक्षक,
ला. प्र. वि. नाशिक
मोबा नं. 8605111234
▶️ ’सापळा पथक’
पोलीस हवालदार दिनेश खैरनार
पोलीस हवालदार गणेश निंबाळकर
पोलीस नाईक अविनाश पवार
पोलीस शिपाई नितीन नेटारे
▶️ ’’ मार्गदर्शक ’ .
’’मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर’
पोलीस अधीक्षक ला. प्र. वि. नाशिक परीक्षेत्र नाशिक
मो. नं. 9371957391
………………..
’याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक येथे संपर्क करावा
दुरध्वनी क्रमांक.
02532578230

’टोल फ्री क्रमांक १०६४

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button