रतनवाडीत राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबिर संपन्न

विलास तुपे /राजूर प्रतिनिधी ः
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ आणि डाॕ.डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीचे, डाॕ.डी.वाय पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक आदान प्रदान – गिर्यारोहण शिबिर पार पडले. या शिबिराचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. पी. डी. पाटील सर, उपाध्यक्ष मा. डाॕ. भाग्यश्रीताई पाटील, सचिव मा. डॉ. सोमनाथदादा पाटील, विश्वस्त डाॕ. स्मिता जाधव डाॕ. यशराज पाटील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डाॕ. संतोष परचुरे आणि प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ व प्राचार्य डाॕ. मोहन वामन हे 1997 पासून कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील रतनवाडी येथे राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबिर घेत आहेत. या शिबिराचे हे 26 वे वर्ष होते. या शिबिरात राज्यभरातून 353 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीला. सर्व विद्यार्थ्यांना रॕंपलिंगचे प्रशिक्षण, रतनगडचे ट्रेकींग करण्यात आले. तसेच रतनगड व रतनवाडी गावची स्वच्छताही विद्यार्थ्यांनी केली. विद्यार्थ्यांना वनस्पती व पक्षी अभ्यास या विषयावर डाॕ. मिलिंद बेंडाळे, औषधी वनस्पती या विषयावर प्रा. सुभाष वरपे तर देवराई बद्दल प्रा. संदीप देशमुख यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डाॕ. मोहन वामन विविध वनस्पती प्रत्यक्षात दाखवून त्या वनस्पतीबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. रानकवी तुकाराम धांडे यांचा कवितांचा कार्यक्रम झाला.
शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. अरूण गायकवाड, बी.एस. टी महाविद्यालय संगमनेरचे प्राचार्य डाॕ. डी. डी. पाटील, रतवाडीचे माजी सरपंच पांढरे पाटील, सरपंच संपत झडे हे होते. याप्रसंगी प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांनी 26 वर्ष शिबिर घेत असताना आलेल्या अडी-अडचणीवर मात करून केलेल्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. डाॕ. अरूण गायकवाड यांनी या शिबिरातून विद्यार्थ्यांवर निसर्ग संवर्धनाचे संस्कार होतात ही बाब कौतूकास्पद आहे असे मत व्यक्त केले. प्राचार्य डाॕ. डी.डी. पाटील यांनी अशी शिबिरे होणे विद्यार्थी हिताचे आहेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गणेश फुंदे, सूत्रसंचालन प्रा. भागवत देशमुख तर आभार विद्यार्थी विकास अधिकारी डाॕ. मुकेश तिवारी यांनी मानले.
या शिबिराच्या नियोजनात विद्यार्थी विकास अधिकारी डाॕ. मुकेश तिवारी, प्रा. गणेश फुंदे, डाॕ. मिनल भोसले, प्रा. खलिद शेख, प्रा. राधाकृष्ण ठाणगे, प्रा. चेतन सरवदे, प्रा. मयुर मुरकुटे प्रा. सतिश ठाकर, प्रा. रोहित वरवडकर, प्रा. दीपाली निंबाळकर यांनी सहभाग घेतला.
