इतरग्रामीण

अकोले आगाराचा भोंगळ व मनमानी कारभार , ,आदिवासी भागात एसटी बसेस रामभरोसे…

संजय महानोर

भंडारदरा / प्रतिनिधी
अकोले आगाराचा आदिवासी भागात मनमानी भोंगळ कारभार सुरू आहे

आदिवासी भागातील अनेक बस फे-या न सांगता अचानक रद्द केल्या जात असल्याने अनेक शालेय विद्यार्थी १५ ते २० कि .मी . पायपिट करुन आपले शालेय पेपर देत आहेत .
अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगेत विशेषतः भंडारदरा धरण व हरिश्चंद्रगडाच्या परिसरात आदिवासी बांधवांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे . या भागात दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने या आदिवासी बांधवांना राजुर /अकोले येथील बाजारपेठेत ये -जा करण्यासाठी पुर्णतः अकोले आगाच्या बस सेवेचाच आधार घ्यावा लागतो .

पंरतु बेफिकीर अकोले आगार मात्र या भागात कधीच नियमित बससेवा देताना दिसुन येत नाही . भंडारद-याच्या घाटघर व रतनवाडी या अतिदुर्गम डोंगराळ आदिवासी भागामध्ये प्रत्येकी एक या प्रमाणे बस दररोज मुक्कामी अकोले आगाराकडुन पाठविली जाते .

पंरतु या बस कधीच वेळेवर रतनवाडी व घाटघरला पोहचत नाहीत . रात्री कायम नऊ नंतरच या बसेच शेंडी या ठिकाणी पोहचतात . व तेथुन पुढे रतनवाडी घाटघरसाठी बस रवाना होतात . शेंडी हे या परिसरातील आदिवासी बांधवांची प्रमुख बाजारपेठ आहे . त्यामुळे अनेक बांधव शेंडी येथे आपल्या जीवनावश्यक वस्तु किंवा ईतर गरजा पुर्ण करण्यासाठी शेंडी येथे ये – जा करत असतात . मात्र रतनवाडी किंवा घाटघर येथे परत जाण्यासाठी अकोले आगाराच्या लालपरीची ताटकळत वाट पहावी लागते .

वाट पाहणा-या प्रवाशांमध्ये वयस्कर व्यक्ती व बाया बापड्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो . त्यातच या बस बस अंधारात येत असल्याने मुक्कामाच्या ठिकाणावरुन अंधारात जिव मुठीत धरुन घराचा रस्ता धरावा लागतो तर कधी जंगलातुन राम नाम घेत घरी पोहचावे लागते . त्यातही ही बस कधी कधी अचानक आगार प्रमुख रद्द करुन आपल्या मनमानीचा कळसच करताना दिसुन येतात .

  • कायम आदिवासी भागातील बस रद्द करणे , तालुक्यात बस न पाठविता लांब पल्ल्याच्या गाड्या पाठविणे , मुद्दाम नादुरुस्त गाड्या आदिवासी भागात पाठविणे , चालक व वाहकच नाहीत, डेपोत गाड्याच नाहीत असे वेगवेगळे कारणे सांगत अकोले आगार व्यवस्थापन बेफिकरपणे काम करत आहे या प्रशासनावर वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याचे दिसुन येत आहे .


सदर बस रद्द झाली कि शालेय विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसतो . सध्याच्या कालावधीत शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शालेय पेपर सुरु असुन हे पेपर देण्यासाठी विद्यार्थी थेट पहाटपासुनच प्रवासाला पायी सुरुवात करुन पेपर साठी येत आहेत . त्यातच रतनवाडी व घाटघर या दोन्ही बस ज्याप्रमाणे उशीरा मुक्कामी पोहचात अगदी त्याचप्रमाणे गावातील माणसे उठायच्या आत निघुन जात असल्याने या बस रिकाम्याच बोंबलत जातात . मग कसे काय या बसला प्रवासी भेटणार . का बस तोट्यात चालणार नाही ?असा साधा सवाल हा आदिवासी बांधव करत आहे . अकोले अगाराचा हा भोंगळ कारभार हरिश्चंद्रगड परिसरातही सुरु असुन आदिवासी बांधवांवर जाणुन बुजुन अकोले आगार प्रमुख अन्याय करत असल्याची भावना व्यक्त करत आहे .

शेंडी हे गाव नवगाव डांगाणाची प्रमुख बाजारपेठ असलेले मध्यवर्ती ठिकाण असुन अकोले आगाराच्या रतनवाडी व घाटघर या दोन बसेस कधीच वेळेवर येत नाहीत. रात्री उशीरापर्यंत महीला आपल्या लहान मुलांसह तासंनतास बसची वाट बघत शेंडीच्या चौकात बसुन असतात . अकोले आगाराने आदिवासी भागातील सेवा सुरळीत करावी , अन्यथा अकोले आगारात येऊन आगार प्रमुखाच्या मनमानी कारभाराविरोधात जनआंदोलन करण्यात येईल.

दिलीप भांगरे

.(.सरपंच, शेंडी)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button