आजचे पंचांग व राशिभविष्य दि.१३/१२/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अग्रहायण २३ शके १९४६
दिनांक :- १३/१२/२०२४,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:५४,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०५:५४,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- हेमंतऋतु
मास :- मार्गशीर्ष
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- त्रयोदशी समाप्ति १९:४१,
नक्षत्र :- भरणी समाप्ति ०७:५०, कृत्तिका २९:४८,
योग :- शिव समाप्ति ११:५४,
करण :- कौलव समाप्ति ०९:०४, गरज ३०:१९,
चंद्र राशि :- मेष,(१३:१९नं. वृषभ),
रविराशि – नक्षत्र :- वृश्चिक – ज्येष्ठा,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- मकर,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- कृत्तिका वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ११:०१ ते १२:२४ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०८:१६ ते ०९:३९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:३९ ते ११:०१ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:२४ ते ०१:४६ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
प्रदोष, घबाड ०७:५० नं. १९:४१ प., यमघंट २९:४८ नं.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अग्रहायण २२ शके १९४६
दिनांक = १३/१२/२०२४
वार = भृगवासरे(शुक्रवार)
मेष
व्यावसायिक स्तरावर एखादी चांगली घटना घडेल. स्वप्नाळू वृत्तीतून बाहेर या. एखादी दिलासादायक घटना घडेल. भाग्याची साथ लाभेल. आर्थिक घडी सुधारेल.
वृषभ
तब्येतीला जपा. छोट्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. उपयोगी वस्तूंची खरेदी केली जाईल. मानसिक प्रसन्नता लाभेल. जवळचे मित्र भेटतील.
मिथुन
मनासारखी घटना घडेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. विक्षिप्त लोकांपासून दूर रहा. वेळेबरोबर चालावे लागेल. प्रगतीला चांगला वाव मिळेल.
कर्क
आवश्यक तेथेच पुढारीपणा स्वीकारावा. गणेशाची आराधना करावी. हस्त कौशल्यासाठी वेळ काढावा. करियर विषयी चिंता वाटू लागेल. आपल्याच विचारात मग्न राहाल.
सिंह
मुलांकडून चांगली बातमी समजेल. हवी असलेली उत्तरे मिळतील. व्यवसायिकांनी सतर्क राहावे. कामाच्या स्वरुपात काही बदल करून पहावेत. प्रयत्नांची कास सोडू नये.
कन्या
कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पहावे. जोडीदाराशी मतभेद टाळा. धावपळीचा दिवस. मात्र धावपळ लाभदायक ठरेल. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ घालावा.
तूळ
आपल्याच मुद्यावर अडून राहाल. मनातील संभ्रम दूर सारावा. उगाचच एखादी चिंता सातवेल. मानसिक दुर्बलता टाळावी. हित शत्रुंवर लक्ष ठेवावे.
वृश्चिक
गरज नसेल तर फार बोलू नका. सामाजिक कामात मदत नोंदवाल. कर्तुत्वाला वाव मिळेल. उगाच लपवा छपवी करू नका. बौद्धिक ताण जाणवेल.
धनू
धार्मिक कामासाठी खर्च कराल. भागीदारीत विचारपूर्वक गुंतवणूक करावी. जुन्या गोष्टी फायदेशीर ठरू शकतात. जुनी येणी प्राप्त होतील. कौटुंबिक जबाबदार्या चिकाटीने पार पाडाव्यात.
मकर
कामावर अधिक निष्ठा ठेवावी. कष्टाला मागे पडू नका. धार्मिक कामात सहभागी होण्याची संधी मिळेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास मिळेल. मित्रांसोबत वेळ घालवाल.
कुंभ
समोरील संधीचा लाभ घ्यावा. समोरील व्यक्तीवर चटकन विश्वास ठेऊ नका. अधिकार्यांचा पाठिंबा मिळवाल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. वेळेचा सदुपयोग करावा.
मीन
अनावश्यक खरेदी केली जाईल. आहारात अति तिखट पदार्थ टाळावेत. प्रगतीच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकाल. वादाच्या मुद्यात अडकू नका. व्यावसायिक स्थैर्याकडे लक्ष द्यावे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर