काकणेवाडी येथील विकास कामांतील गैरव्यवहारची चौकशी करा – राहुल पवार

चौकशी न झाल्यास उपोषणाचा दिला इशारा
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी-
पारनेर तालुक्यातील काकणेवाडी येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात विकास कामे झाली असून ही सर्व कामे निकृष्ट दर्जाची असून त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप अन्याय निर्मूलन समितीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते राहुल पवार यांनी केला आहे.
त्यांनी या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांचेकडे पत्रव्यवहार केला असुन चौकशी ची मागणी केली आहे ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. आतापर्यंत काकणेवाडी गावामध्ये जेवढा निधी उपलब्ध झाला ती सर्व कामे निकृष्ट दर्जाची झालेली असून या कामांमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे .या कामांमध्ये गावची वेस, राष्ट्रीय पेयजल योजना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विकास कामे, गावची शौचालय योजना तसेच राम मंदिरापुढील व सभागृहात पेवब्लॉक बसवणे यामधील भ्रष्टाचार तसेच अंगणवाडी . या सर्व कामांची बिले काम होण्याच्या अगोदरच संबंधित ठेकेदारांनी काढून घेतली आहेत असा आरोप राहुल पवार यांनी केला आहे.
याला संबंधित ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक तसेच ठेकेदार जबाबदार असून यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल न झाल्यास आमरण उपोषण करणार असल्याची माहिती राहुल पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.