नगर-पुणे महामार्गावर’ अॅब्युलंसच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या चालकाचा सन्मान !

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधीं:-
महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेच्या वतीने अविनाश पवार यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून एक अनोखा उपक्रम हाती घेऊन अहमदनगर – पुणे महामार्गावर अॅक्सीडेंट झाल्यावर सेवा देणा-या सर्व सरकारी अॅब्युलंस १०८ सह सर्व खाजगी देवदूतांसारखे धाऊन जाणारे अॅब्युलंस चालक तसेच डाॅक्टर यांचा सन्मान करुन ते करत असलेल्या प्रामाणिक व उत्कृष्ट सेवेबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सुपा उप सरपंच दत्ता नाना पवार यांच्या हस्ते पारनेर १०८ व सुपा १०८ चे डॉ. विलास काळे,डॉ.नरेंद्र मुळे, डॉ. शत्रूध्न मगर, पायलट किशोर मडके, किशोर घनवट या देवदुतांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ‘सरकार’ नावाने खासगी अॅब्युलंस सर्वीस देणारे चालक सादिक भाई यांनी गरजवंतांना हाॅस्पीटल मध्ये जाण्यास अत्यल्प दरात सेवा देण्याचा संकल्प केला. यावेळी माजी सरपंच बाळासाहेब पवार,पांडुरंग पवार, अक्षय सुर्यवंशी ,सुनील पवार,अनिल नलगे सह महाराष्ट्र सैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.