इतर

पिचड साहेब आदिवासी बांधव व आंबेडकरी जनता यांच्यामधील दुवा होते


महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आदिवासी समाजाचे नेते मधुकरराव पिचड यांनी अखेर चा श्वास घेतला हा योगायोग हे दर्शवतो की एका आदिवासी नेत्यान महामानवाच्या चरणी लिन होणे होय.
मधुकररावजी पिचड साहेब म्हणजे आदिवासी समाजाच दैवत होय. त्यांनी आदिवासी समाजाला प्रगतीपथावर आणण्यासाठी व त्यांच्या जीवन मानात अतोनात बदल घडवण्यासाठी अपार कष्ट केले. आदिवासी समाजाच्या उन्नतीचा ध्यास घेतलेल्या पिचड साहेबांनी स्वतंत्र ” आदिवासी बजेट ” ची स्थापना केली. आदिवासी समाजासाठी महाराष्ट्र राजाच्या अर्थसंकल्पच्या ९ टक्के स्वतंत्र बजेट केले. असा प्रयोग महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात करणारे मधुकरराव पिचड हे पहिले राजकीय नेते होते. आदिवासी गावांना पैसा चा दर्जा दिला. गावचा कारभार हातात आदिवासी राजा केला. हिंदू महादेव कोळी जात आदिवासी नाही म्हणून जे सुप्रीम कोर्टात याचिका होती ती जिंकून कोळी महादेव व हिंदू महादेव कोळी एक असल्याचा निकाल घेतला त्यामुळं संपूर्ण समाज आदिवासी जमातीत राहिला.
आदिवासी विकास मंत्री म्हणून आश्रम शाळा, इंग्रजी माध्यमाच्या आश्रम शाळा, निवासी आश्रम शाळा निर्माण केल्या. संपूर्ण महाराष्ट्रात एकट्या आदिवासी तालुक्यासाठी स्वतंत्र प्रकल्प कार्यालय निर्माण केले. आदिवासींच्या उन्नतीचा आलेख उंचावरर्ती नेला. उन्नती सेवा मंडळाच्या आश्रम शाळा स्थापन करून फक्त अकोले तालुक्यात शिक्षणाचे जाळ निर्माण केले. तालुक्यातील गरीब आदिवासी होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली केली. यामुळे आदिवासी शिकू लागला आणि यातूनच आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये बदल घडला. अनेक मोठे अधिकारी घडले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ” शिका संघटित व्हा अन संघर्ष करा ” अशी शिकवण दिली ती शिकवण मधुकरराव पिचड यांनी जीवन भर अंगीकारली अन हिच शिकवण आपल्या आदिवासी समाजात राबवली. आदिवासी समाजाची प्रगती व उन्नती दिसून येत आहे. आदिवासी समाजाला मधुकरराव पिचड यांच्या सारखा एवढा दूरदृष्टी व चाणाक्ष बुद्धीचा नेता मिळाला हे आदिवासी समाजाचे भाग्यच आहे.
बाबासाहेब जसे फक्त दलित समाजापुरते नव्हते तसे मधुकरराव पिचड हे आदिवासी समाजा चे नेते नव्हते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून नारायण राणे समितीत पहिली सही करणारे मधुकराव पिचड साहेब होते. मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्व महाराष्ट्राचा दौरा करणारे पिचड साहेब होते.
रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब समाजकल्याण मंत्री व मधुकररावं पिचड साहेब आदिवासी विकास मंत्री म्हणून एकत्र काम मंत्रिमंडळात करताना दोघांनी दोन्ही समाजाला न्याय देण्याचे काम एकत्र केले.
अगस्ती साखर कारखान्या ची अकरा महिन्यात निर्मिती असेल अथवा अमृतसागर दूध संघाची उभारणी असेल यातून बहुजन समाजाची आर्थिक उन्नती साधन्याची किमया पिचड साहेबांनी केली.
अकोले तालुक्यात दादासाहेब रुपवते यांच्या मार्गदर्शनातून अकोले एजुकेशन संस्थाच्या माध्यमातून बहुजन समाजाची शिक्षणाची सुविधा निर्माण केली. भाऊसाहेब हांडे ना बरोबर घेऊन सहकारी सोसायटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज देऊन पाईपलाईन, गायी देऊन आर्थिक क्रांती केली.
अकोले तालुक्यात आदिवासी मराठा, ओबीसी, दलित समाज आज गुण्या गोविंदाने एकत्र स्वाभिमानाने आपले जीवन जगताना दिसतो आहे. याच्या पाठीमागे सर्वात मोठे योगदान जर कोणाचे असेल तर ते फक्त मधुकरराव पिचड यांचेच आहे.
आदिवासी समाजाच्या विकास उन्नतीसाठी झटणारे महामानव मधुकररावजी पिचड साहेब या थोर आदिवासी महामानव ला कोटी कोटी प्रणाम व विनम्र अभिवादन आणि अंतकरण पूर्वक श्रद्धांजली.


श्री. राजेंद्र गवांदे
तालुकाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी, अकोले तालुका
सरपंच, कळस ग्रामपंचायत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button